-
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सिनेसृष्टीपासून लांब असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते.
-
ती अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड फोटोमुळे सतत चर्चेत असते.
-
बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिप असो किंवा तिने परिधान केलेले ड्रेस, तिला वेगवेगळ्या कारणांसाठी अनेकदा ट्रोल करण्यात येतं.
-
मलायका बॉलिवूडमधील वादग्रस्त अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.
-
मलायकाच्या रोखठोक बोलण्यामुळे सिनेसृष्टीत तिने अनेक शत्रू निर्माण केले आहेत.
-
यामुळे अनेकांनी तिच्याशी चित्रपटात काम करण्यास नकार दिले आहेत.
-
सलमान खान – बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सलमानचा भाऊ अरबाज खान याच्यासोबत मलायकाने घटस्फोट घेतल्यानंतर तिने अर्जुन कपूरला डेट करणे सुरु केले. तिच्या याच निर्णयामुळे तिने सलमानची नाराजी ओढवून घेतली.
-
विशेष म्हणजे सलमानला मलायकाच्या काही सवयी अजिबात आवडत नाहीत. तसेच अरबाज खानसोबत विभक्त झाल्यानंतर सलमानने तिच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर सलमान तिचा प्रचंड तिरस्कार करतो.
-
अरबाज खान – मलायका अरोरा आणि तिचा पती अरबाज खान यांच्यातही छत्तीसचा आकडा आहे.
-
घटस्फोटानंतर मलायका अरोरा आणि अरबाज खान फार क्वचित एकत्र दिसले आहेत. मात्र, अरबाज खान त्याच्या मुलाला भेटण्यासाठी नेहमी जात असतो.
-
सोनम कपूर – अर्जून कपूरमुळे सोनम कपूर ही मलायकाची शत्रू बनली आहे. सोनम कपूरला मलायका अजिबात आवडत नाही.
-
एका पार्टीत मलायकाने मद्यधुंद अवस्थेत सोनम कपूरला बरीच खडेबोल सुनावले होते, असेही बोललं जातं.
-
कतरिना कैफ – कतरिना कैफला मलायका अजिबात आवडत नाही. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानची बहीण अलविराच्या एका पार्टीमध्ये कतरिना कैफने मलायका अरोराला ‘कॉपिड’ असे म्हटले होते. यामुळे त्यांच्या दोघात वाद झाला. त्यावेळी मलायका अरोरा कतरिना कैफला त्या पार्टीत का आमंत्रित केले यावरुन नाराज होती.
-
काजोल – २०१७ पासून काजोल आणि मलायकाच्या भांडणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. एका कार्यक्रमादरम्यान काजोलने मलायका अरोराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. या दोघांच्या भांडणाचे कारण करण जौहर असल्याचे बोललं जात आहे.
-
त्यादरम्यान करण जोहर आणि काजोल यांच्यात मतभेद सुरु होते. त्यामुळे काजोलने मलायकाकडे दुर्लक्ष केले होते. काजोलप्रमाणे मलायका अरोरा देखील करण जोहरची खास मैत्रिण आहे..

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन