-
क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनच्या जामीन याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. मात्र आर्यनच्या याचिकेवर मंगळवारी (२६ ऑक्टोबर) सुनावणी घेण्याचे या वेळी न्यायालयाने स्पष्ट केले.
-
विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर आर्यनने त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर आर्यनची याचिका गुरुवारी सादर करण्यात आली. त्या वेळी याचिकेवर शुक्रवारीच तातडीची सुनावणी घेण्याची मागणी आर्यनच्या वकिलांकडून करण्यात आली. परंतु केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. न्यायालयानेही एनसीबीची मागणी मान्य करत याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले.
-
मात्र आर्यनचा मुक्काम पुन्हा एकदा वाढल्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त करत शाहरुख खानला आणि आर्यनला पाठिंबा देण्यास सुरुवात केलीय. बऱ्याच सेलिब्रिटींनी आर्यनला अशापद्धतीने कोठडीमध्ये ठेवणं हे योग्य नसल्याचं संकेत देणारे ट्विट आणि पोस्ट केलेत.
शाहरुखच्या चाहत्यांकडूनही आर्यन केवळ शाहरुखचा मुलगा असल्याने त्याला हे सहन करावं लागत असल्याचं मत सोशल नेटवर्किंगवर मागील दोन तीन आठवड्यांमध्ये अनेकदा मांडलं आहे. -
याच सर्व गोंधळामध्ये आता शाहरुखचा एक जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत आलाय. या व्हिडीओमध्ये शाहरुखने लोकप्रिय असल्याचे तोटे सांगतिले होते.
-
“मी जे नाव कमावलं आहे त्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद होईल आणि मला ते व्हावं असं वाटतं नाही,” असं शाहरुख या मुलाखतीमध्ये म्हणालेला.
-
२००८ साली शाहरुखने जर्मन टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रसिद्धीमुळे कधीतरी माझी मुलं अडचणीत येतील अशी भीती व्यक्त केलेली.
-
माझ्या प्रसिद्धीचा परिणाम माझ्या मुलांवर होईल असं शाहरुख म्हणालेला.
-
“माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चिंता ही माझं कुटुंब आहे. खास करुन माझ्या मुलांची मला फार चिंता वाटते. ते माझ्या नावाच्या प्रभावाखाली जगणार नाहीत अशी अपेक्षा आहे,” असं शाहरुखने म्हटलेलं.
-
“माझी लोकप्रियता हाच मला माझ्या कुटुंबाबद्दलच्या भीतीचा सर्वात मोठा घटक वाटतो,” असं शाहरुखने म्हटलं होतं.
-
“त्यांना माझ्या लोकप्रियतेशी झगडावं लागता कामा नये,” असं मत शाहरुखने व्यक्त केलेलं.
-
“ती माझी मुलं आहेत म्हणून त्यांना आयुष्यात इतर काही करायचं नाहीय, असे त्यांचे विचार असता कामा नये,” असंही शाहरुखने म्हटलेलं.
-
“हे अगदी खरं आहे की मला मिळालेली प्रसिद्धी त्याचं आयुष्य खराब करु शकते, मात्र मला ते होऊ द्यायचं नाहीय,” असं शाहरुखने स्पष्ट केलेलं.
-
“मला त्यांचे वडील या नावाने ओळखलं पाहिजे. फक्त ती माझी मुलं आहेत म्हणून त्यांना ओळख मिळावी असं मला वाटतं नाही,” असं रोकठोक मत शाहरुखने मांडलेलं. मात्र आता हा व्हिडीओ चर्चेत आलेला असतानाच शाहरुखच्या चाहत्यांनी त्याची भीती खरी ठरत असल्याचं मत व्यक्त केलंय.
-
आर्यनला अटक झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी शाहरुखला मन्नतमध्ये जाऊन भेट घेतलीय. यामध्ये सलमान खान, करण जोहर यासारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.
-
शाहरुखचा मुलगा आर्यन याला या प्रकरणानंतर अभिनेता ऋतिक रोशन, हंसल मेहता, पुजा भट्ट, रविना टंडन यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल नेटवर्किंगवरुन पाठिंबा दर्शवलाय. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवरुन, एएनआय, पीटीआयवरुन साभार)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख