-
मुंबई-गोवा क्रूझवरील अमली पदार्थांच्या पार्टीप्रकरणी एनसीबीकडून कसून चौकशी सुरु आहे.
-
याप्रकरणी एनसीबीने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान गेल्या जवळपास २० दिवसांपासून तुरुंगात आहे. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्ह दिसत नाही.
-
बुधवारी एनडीपीएसच्या विशेष न्यायालयानं आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आर्यनच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
-
या संपूर्ण प्रकरणामुळे अभिनेता शाहरुख खान अडचणीत सापडला आहे.
-
दरम्यान आर्यन खान हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला जात आहे. यासाठी २५ कोटी रुपयांची डील झाली.
-
त्यातील ८ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचाही दावा प्रभाकर साईलने या कथित व्हिडीओत केला जात आहे. मात्र यातील कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
-
या संपूर्ण प्रकरणानंतर बॉलिवूडच्या किंग खान शाहरुख खानची एकूण संपत्ती किती? असा सवाल समोर होत आहे.
-
बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानने १९८८ मध्ये अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली आणि त्याचा प्रवास अजूनही सुरूच आहे.
-
इंडस्ट्रीतील या २७ वर्षांत शाहरुखने असंख्य चाहते कमावले. इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक शाहरुख असून त्याने आतापर्यंत ८० हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे.
-
भारतीय सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्याला ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
-
एबीपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार शाहरुखची एकूण संपत्ती ६०० मिलियन डॉलर म्हणजे ४४ अब्ज ९९ कोटी ९७ लाख इतकी आहे.
-
त्यासोबत वांद्रे इथल्या शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याचा समावेश जगातील टॉप १० बंगल्यामध्ये होतो.
-
हा बंगला पूर्णपणे पांढऱ्या मार्बल लाद्यांनी बनवला गेला आहे. ६००० चौरस फुटांच्या ‘मन्नत’ बंगल्यात बेडरूम, लिविंग एरिया, जीम, खासगी बार, लायब्ररी, मुलांसाठी प्लेरूम आहे.
-
हा बंगला १९९५ मध्ये शाहरुखने १३ कोटी रुपयांना खरेदी केला होता. आता या बंगल्याची किंमत आता जवळपास २०० कोटी रुपये इतकी आहे.
-
अलिबागमध्येही शाहरुखचा फार्महाऊस आहे. दुबईमध्ये शाहरुखचा ‘व्हिला के ९३’ हा बंगला आहे. तर लंडनमधील पार्क लेन इथंसुद्धा त्याचं घर आहे. ही संपत्ती जवळपास १६७ कोटी रुपयांची आहे.
-
किंग खानला महागड्या आणि आलिशान गाड्या विकत घेण्याची आवड आहे. शाहरुखकडे सर्वात महागडी वॅनिटी व्हॅन आहे. याची किंमत ३.८ कोटी आहे.
-
‘ऑडी A6’, ‘बीएमडब्ल्यू i8’, ‘बीएमडब्ल्यू 7 सीरिज’, ‘हार्ले डेव्हिडसन डायना स्ट्रीट बॉब’ ‘बेंटली कॉन्टिनेंटल जीटी’ अशा महागड्या गाड्या त्याच्याकडे आहेत.
-
शाहरुख खान दर महिन्याला ४३ लाखांचे विजेचे बिल भरतो. तसेच शाहरुख हा भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
-
‘कोलकाता नाइट रायडर्स’ या आयपीएलमधील संघाचा तो सहमालक आहे. शाहरुखचे ५५ टक्के शेअर्स त्यात असून त्याची किंमत सुमारे ५७५ कोटी रुपये इतकी आहे.
-
शाहरुखच्या ‘रेड चिलीज’ या निर्मिती कंपनीची वार्षिक उलाढाल ५०० कोटींच्या आसपास आहे.
-
शाहरुख हा चित्रपटांसोबत जाहिरातातूनही भरपूर कमाई करतो. तो एका चित्रपटासाठी ८० कोटी रुपये मानधन घेतो.
-
त्याचे वार्षिक उत्पन्न जवळपास २४० कोटी आहे. तसेच ९३० कोटी रुपयांची त्याने वैयक्तिक गुंतवणूक केली आहे.

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?