-
बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारताला मात देत नव्या इतिहासाची नोंद केली आहे.
-
दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला.
-
वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्ताने भारताला पहिल्यांदाच मात दिली आहे.
-
पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा, केएल राहुल हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर विराटने किल्ला लढवला.
-
त्याच्या अर्धशतकी योगदानामुळे भारताने पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान दिले.
-
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने धडकी भरवणारा स्पेल टाकला आणि रोहित, राहुल आणि विराटला माघारी धाडले.
-
प्रत्युत्तरात सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कप्तान बाबर आझम यांनी दमदार १५२ धावांची भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला.
-
रिझवानने नाबाद ७९ तर बाबरने नाबाद ६८ धावांची खेळी केली. आफ्रिदीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
-
भारत आणि पाकिस्तान या सामन्याचा थरार बघण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
-
हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार उपस्थित होता.
-
यावेळी त्याच्या बाजूला जय शहा, टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन ही स्टेडिअममध्ये मॅचसाठी बसलेला पाहायला मिळाला.
-
तसेच बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा, मॉनी रॉय या अभिनेत्रींनीही हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली.
-
मात्र या सर्व सेलिब्रेटींमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलावर सर्वांच्याच नजरा खिळल्या.
-
उर्वशीचे सामन्यादरम्यान भारतीय संघाला प्रोत्साहन देतानाचे अनेक फोटो व्हायरल होत आहे.
-
अनेक बॉलिवूड कलाकारांसह उर्वशीही भारताला चीअर करण्यासाठी दुबईच्या स्टेडिअमवर पोहोचली होती.

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा