-
बॉलिवूडमधील ‘हिरो नंबर वन’ म्हणून प्रसिद्ध असलेला गोविंदा हा तमाम प्रेक्षकांचा आवडता अभिनेता आहे.
-
अभिनयासोबतच त्यांच्या डान्सची चर्चा सर्वत्र आहे.
-
नुकतंच गोविंदाने ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२१’ या सोहळ्यात उपस्थिती दर्शवली. त्याची धमाकेदार एंट्री एका जबरदस्त डान्स परफॉर्मन्सने झाली. आता गोविंदा मंचावर आल्यावर त्याच्यासोबत डान्स करण्याचा मोह कलाकारांना देखील आवरला नाही.
-
या मंचावर झी मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री म्हणजेच ‘मन झालं बाजींद’ मधली कृष्णा, ‘मन उडु उडु झालं’ मधील दिपू, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील स्वीटू, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील नेहा आणि ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मधील अदिती या सगळ्याजणी गोविंदासोबत थिरकण्यासाठी सज्ज झाल्या. इतकंच नव्हे तर सगळ्यांची लाडकी परी देखील गोविंदासोबत थिरकण्याचा मोह आवरू शकली नाही.
-
गोविंदाने ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२१’ च्या मंचावर ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेच्या शीर्षक गीतावर ताल धरला आणि स्वतःच्या स्टाईलमध्ये परफॉर्म करून सगळ्यांना नाचायला भाग पाडलं.
-
या सगळ्यांचा हा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहण्यासाठी बघायला विसरू नका ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२१’ शनिवार ३० ऑक्टोबर रोजी संध्यकाळी ७ वाजता झी मराठीवर.

१२ मार्च राशिभविष्य: मघा नक्षत्राबरोबर जुळून आलाय सुकर्म योग! १२ पैकी कोणत्या राशीला होणार फायदा आणि तोटा?