-
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयानं अखेर जामीन मंजूर केला आहे.
-
आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन देण्यात आला आहे.
-
त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झालं आहे.
-
आर्यनला जामीन मिळाल्यानंतर चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. अनेक चाहत्यांनी तर मन्नतसमोर येऊन फटाके फोडत आनंद व्यक्त केला.
-
तर दुसरीकडे आर्यन खानला जामीन मिळाल्याची माहिती मिळताच बॉलिवूडमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळत आहे.
-
आर्यन खानला अटक झाल्यापासून त्याला जामीन मिळेपर्यंत अनेकांनी खान कुटुंबाला समर्थन देणारे ट्वीट केले होते.
-
आर्यनला जामीन मिळताच अनेक कलाकारांनी शाहरुख खानचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.
-
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यनला जामीन मिळाल्याची माहिती मिळताच गौरी खान फार भावूक झाली. ती गुडघ्यावर बसून रडू लागली.
-
तर शाहरुख खानला अनेकांनी फोन करत त्याचे अभिनंदन केले.
-
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यनला जामीन मिळाल्याची माहिती मिळताच गौरी खान फार भावूक झाली. ती गुडघ्यावर बसून रडू लागली.
-
यात सर्वात आधी शाहरुखला सलमान खान, त्यानंतर सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार या तिघांनी फोन केले.
-
यावेळी त्यांनी शाहरुखची चौकशी करत त्याचे अभिनंदन केले.
-
तर गौरी खानला तिची मैत्रीण महीप कपूर आणि सीमा खान यांनी फोन केला. यावेळी तिला अश्रू अनावर झाले.
-
त्यासोबतच सुहाना खानकडे आर्यनच्या अमेरिकेतील काही मित्रांनी फोन करत विचारपूस केली.
-
आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह (PR Bond) १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
-
मुंबई उच्च न्यायालयाने आज (२९ ऑक्टोबर) याबाबत सविस्तर निकालपत्र दिलं. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय दिला होता.
-
त्यामुळे आता आज आर्यन खानसह तिघेही तुरूंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे.

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन