-
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’
-
थोड्या वेगळ्या पठडीतील, निखळ मनोरंजनाचा आनंद देणारी मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’कडे पाहिले जाते. ही मालिका टीआरपी यादीमध्ये नेहमी टॉप ५मध्ये असते.
-
या मालिकेतील प्रत्येक पात्राची वेगळी अशी ओळख आहे. त्याप्रमाणेच मालिकेतील कलाकार हे अतिशय लोकप्रिय आहेत.
-
या मालिकेमधून अनेक कलाकरांनी मालिकेला रामराम ठोकला असला तरी ते सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात.
-
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत ‘बावरी’च्या भूमिकेला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली होती.
-
‘बावरी’चे खरे नाव अभिनेत्री मोनिका भदोरिया असे आहे.
-
मोनिका ही मालिकेत फार साध्या, सोज्वळ अवतारात पाहायला मिळते.
-
मात्र खऱ्या आयुष्यात ती फार बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
-
मोनिकाला वेस्टर्न कपडे परिधान करण्याची फार हौस आहे.
-
त्यामुळे ती अनेकदा पाश्चिमात्य कपडे परिधान केलेले फोटो शेअर करत असते.
-
मोनिका ही मूळची मध्यप्रदेशात राहणारी आहे.
-
गेल्या सहा वर्षांपासून मोनिका या मालिकेत बावरीची भूमिका साकारताना दिसते.
-
मात्र गेल्या काही दिवसांपासून तिने या मालिकेतून एक्झिट घेतल्याचे बोललं जात आहे.
-
मालिकेतील भूमिकेसाठी मिळणाऱ्या मानधनात मोनिका खूश नव्हती.
-
तिने निर्मात्यांकडे मानधन वाढवून देण्याची मागणी केली होती.
-
मात्र अनेक वेळा निर्मात्यांना सांगूनही मानधनात वाढ न झाल्याने मोनिकाने अखेर मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.
IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?