-
‘झुबैदा’, ‘हिरो नंबर १’, ‘हम साथ साथ है’ यांसारख्या चित्रपटातून विविध भूमिका साकारत प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री म्हणून करिश्मा कपूर ओळखली जाते.
-
अभिनेत्री करिश्मा कपूरने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला.
-
करिश्मा पडद्यावर जरी झळकत नसली तरीही ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.
-
बॉलिवूडमध्ये कपूर खानदानाचे असलेले वर्चस्व काही वेगळे सांगायला नको. या कुटुंबातून आलेला प्रत्येक व्यक्ती चित्रपटसृष्टीत चमकला आहे.
-
या कुटुंबातील मुलींना आधी चित्रपटसृष्टीत काम करण्याची परवानगी नव्हती. मात्र, हा पायंडा मोडीत काढत करिश्मा कपूरने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थानही मिळवले.
करिश्माचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. -
मात्र बॉलिवूडच्या लोलोने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून लांब राहणं पसंत केले आहे.
-
करिश्मा गेल्या कित्येक वर्षांपासून चित्रपट, जाहिरात यासारख्या ठिकाणी फार कमी दिसते. मात्र तिचे राहणीमान पाहून प्रत्येकाला तिचा घरखर्च कसा चालतो? असा प्रश्न अनेकांना पडतो.
-
अभिनेत्री करिश्मा कपूरने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला. मात्र दिल्लीचा व्यावसायिक संजय कपूर याच्याशी लग्न केल्यानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर राहिली.
-
लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षे करिश्मा-संजयचं नातं चांगलं होतं. मात्र पाच-सहा वर्षानंतर या दोघांमध्ये वादविवाद सुरू झाले.
-
२००३ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती आणि २०१६ मध्ये ते विभक्त झाले. करिश्माचा हा प्रेमविवाह होता.
-
करिश्मा आणि संजयचा घटस्फोट बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात महागड्या घटस्फोटातील एक म्हणून ओळखला जातो.
-
एका रिपोर्टनुसार, करिश्माला संजय कपूरने घटस्फोटावेळी एक मोठी रक्कम दिली होती.
-
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा हा करिश्माला मिळाला.
मुलांच्या संगोपनात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी संजय कपूरने खारमधील घर करिश्माच्या नावावर केले होते. -
यासोबतच संजय कपूरकडून करिश्माला दर महिन्याला लाखो रुपये खर्चासाठी दिले जातात.
-
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा हा करिश्माला मिळाला असला तरी संजय कपूर वर्षातून दोन महिने मुलांसोबत वेळ घालवतो.
-
विशेष म्हणजे करिश्मा कपूरकडे मुलांचा ताबा असतानाही संजय कपूर आपल्या मुलांवर लाखो रुपये खर्च करतो.
-
तसेच मुलाच्या खर्चांसाठी त्याने १४ कोटींचा बाँड केला होता. त्यासोबत तो करिश्मा कपूरला दरमहा 10 लाख रुपये देतो, असं म्हटलं जाते.
Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…