-
‘किंग खान’, ‘बादशाह’, ‘बाजीगर’ अशा अनेक नावांनी चाहत्यांमध्ये लोकप्रिय असणारा आणि मागील तीन दशकांपासून बॉलिवूडवर राज्य करणारा अभिनेता शाहरुख खान याचा आज वाढदिवस…
-
विविध चित्रपटातून राहुल, राज, डॉन अशा भूमिका साकारणाऱ्या किंग खानने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे.
-
भारतात आणि भारताबाहेर शाहरुखचा तुफान चाहतावर्ग आहे.
-
सुरुवातीला अभिनयाशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या शाहरुखचा किंग खानपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता.
-
शाहरुखचं नाव आधी अब्दुल रेहमान होतं. त्याच्या आजीने हे नाव ठेवलं होतं.
-
पुढे त्याच्या वडिलांनी अब्दुल रेहमान हे नाव बदलत शाहरुख असं ठेवलं.
-
शाहरुख लहानपणापासून अभिनयासोबतच अभ्यासात व हॉकी, फूटबॉलमध्येही अव्वल होता.
-
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शाहरुखच्या वडिलांचं कॅन्टीन होतं.
-
त्यावेळी शाहरुख बराच वेळ तिथेच घालवत असे. तिथे बऱ्याच कलाकारांशी त्याची भेट झाली.
-
एकेकाळी शाहरुखने थिएटरबाहेर तिकीटंही विकली होती.
-
त्यातून मिळालेले ५० रुपये त्याची पहिली कमाई होती.
-
बॉलिवूडमध्ये स्वत:चं अस्तित्त्व निर्माण करायचं असेल तर कोणीतरी ‘गॉडफादर’ हवाच असं अनेकदा कलाकारांनी मान्य केलं आहे.
-
चित्रपट इण्डस्ट्रीत करिअर घडवण्यासाठी आलेला शाहरूख बघता बघता बॉलिवूडचा ‘बादशहा’ झाला.
-
त्याची मुलंही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहेत.
-
शाहरुखनं एका मुलाखतीत प्रथमच त्याच्या बॉलिवूडमधल्या ‘गॉडफादर’विषयीचं गुपित उघड केलं होतं.
-
‘संघर्षाच्या काळात मी मुंबईत आलो. यावेळी मी सलमानच्या घरात जेवायचो. सलमानचे वडील सलीम खान माझी खूप काळजी घ्यायचे. आज मी जे काही आहे ते केवळ सलीम खान आणि त्यांच्या कुटुंबियांमुळेच आहे’ असं शाहरुखनं म्हटलं होतं.
-
शाहरुखने हा अनुभव शेअर केल्यानंतर अनेकांनी सलीम खान हे शाहरुखचे गॉडफादर असल्याचं म्हटलं आहे. मात्र, शाहरुखने कधीच या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
-
(सर्व फोटो सौजन्य : शाहरुख खान / इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल