-
सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचीच चर्चा पाहायला मिळात आहे.
-
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या दोघींनी बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केलं.
-
जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
यानंतर जान्हवी ‘रुही’ आणि ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.
-
‘केदारनाथ’ चित्रपटातून साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
त्यानंतर ती रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटात झळकली.
-
साराचा ‘कूली नंबर १’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.
-
जान्हवी कपूर आणि सारा अली खान जिवलग मैत्रिणी आहेत.
-
सारा आणि जान्हवी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात.
-
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात.
-
नुकतंच या दोघींनी चारधाम यात्रेतील केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
-
गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार स्थळाला हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाते.
-
केदारनाथ मंदिरा परिसरातील काही फोटो साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही चारही ठिकाणे १०००० फुटांपेक्षा अधिक उंच आहेत.
-
जान्हवीने इन्स्टाग्रामवर उत्तराखंड मधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
जान्हवी आणि साराचे लाखो चाहते आहेत.
-
लवकरच जान्हवी ‘गुडलक’, ‘तख्त’, ‘दोस्ताना २’ आणि ‘रणभूमि’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
-
सारा आणि जान्हवीचे बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
सारा लवकरच दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
सारा आणि जान्हवी सध्या त्यांच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर आणि सारा अली खान / इन्स्टाग्राम)
बुलढाण्यातील केस गळतीचे रहस्य उलगडले; रोजच्या आहारातील अन्न ठरतंय कारणीभूत, जाणून घ्या कारण