-
अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या अभिनयासोबत सौंदर्यसाठी ओळखली जाते.
-
तेजस्विनी सोशल मीडियावर सक्रिय असून वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
-
काही दिवसांपूर्वीत तेजस्विनीने एक खास फोटोशूट केलंय.
-
या फोटोशूटचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोशूटला तिने ‘ट्रॉपिकल’ असं कॅप्शन दिलं होतं.
-
तसचं सुरुवातीचे काही फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये खूप दिवसांपासून प्रलंबित असलेलं फोटोशूट अखेर केल्याचं सांगितलं.
-
तसचं पुढील काही दिवस या फोटोशूटचे फोटो शेअर करत राहिन असंही तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. हिरवा रंग आवडत असल्याने फोटो शेअर करत राहिन असं ती म्हणाली.
-
त्यानंतर एक दोन दिवसांच्या अंतराने हटके कॅप्शन देत तेजस्विनेने तिचे हे बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
-
यातील नुकत्यात शेअर केलेल्या फोटोंना तेजस्विनीने हटके कॅप्शन दिलंय.
-
या फोटोंमध्ये तेजस्विनीने बोल्ड एक्स्प्रेशन दिले असले तरी तिने दिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
-
“दिवाळीच्या दिवशी मोती साबणाने अंघोळ केल्यानंतर आरशात स्वतःला न्याहाळतानाचे एक्सप्रेशन” !!! असं कॅप्शन देत तिने हसतानाचे स्माईली दिले आहेत.
-
दिवाळीच्या दिवसांमध्ये दिलेल्या या हटके कॅप्शनवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देत तेजस्विनीच्या फोटोंना पसंती दिलीय.
-
अभिनेत्री अभिज्ञा भावे, सोनाली खरे तसचं अभिनेता सुयश टिळकने तेजस्विनीच्या फोटोवर कमेंट बॉस्कमध्ये प्रतिक्रिया दिल्या आहेत.Photo-Instagram@tejaswini_pandit)

२८ फेब्रुवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटचा दिवस ‘या’ तीन राशींचे भाग्य पालटणार? कोणाला कामातून आनंद तर कोणाला अनपेक्षित लाभ होणार