-
गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता आणि मराठी अभिनेता अक्षय वाघमारे सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात.
-
ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.
-
अक्षय आणि योगिता यांना दोघांना ७ मे रोजी कन्यारत्नाचा लाभ झाला.
अक्षय व योगिताने त्यांच्या मुलीचे नाव ‘अर्णा’ ठेवले आहे. -
अक्षय आणि योगिता नेहमीच मुलीसोबतचे विविध फोटो शेअर करत असतात.
-
काही दिवसांपूर्वी अक्षयने लेकीसोबतचा एक गोड फोटो शेअर केला होता.
-
यात योगिता ही सेल्फी काढताना दिसत आहे.
-
तर मुलगी अर्णा ही बाबागाडीत बसून छान पोझ देताना दिसत आहे.
-
हा फोटो पोस्ट करताना अक्षयने ‘जेंटेलमन ऑन ड्युटी’ असे कॅप्शन दिले होते.
-
यापूर्वी योगिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नवरात्रीदरम्यानचे काही फोटो पोस्ट केले होते.
यात योगिता, अक्षय आणि अर्ना हे तिघेही दगडी चाळीतील देवीचे दर्शन घेताना दिसत आहे. तर एका फोटोत अर्णा ही तिच्या आजी-आजोबांसोबत दिसत आहे. -
अर्नाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
अक्षय वाघमारे आणि योगिता गवळीने ८ मे २०२० रोजी लग्नगाठ बांधली. मुंबईतल्या दगडी चाळीत हा विवाहसोहळा पार पडला होता.
काही दिवसांपूर्वी अक्षय वाघमारे हा बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये झळकला होता. -
अक्षयने बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. तसंच ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातही अक्षयनं महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य – योगिता गवळी, अक्षय वाघमारे / इन्स्टाग्राम)
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर