-
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री क्रांती रेडकर पती समीर वानखेडे यांच्यामुळे चर्चेत आहे. सतत समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यामधील आरोप प्रत्यारोप सुरु आहे.
-
त्यात दिवाळी या हिंदू संस्कृतीतील सगळ्यात महत्त्वाच्या सणाला सुरुवात झाली आहे.
-
हे पाहता कोणत्याही गोष्टीचा विचार न करता क्रांतीने तिच्या घरी दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला आहे.
-
क्रांतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
क्रांती घराच्या बाहेर दिवे लावत असल्याचे दिसतं आहे.
-
क्रांतीने दिवाळी पती समीर वानखेडेंच्या बहीनीसोबत साजरी केली आहे. त्याचेच हे फोटो क्रांतीने शेअर केले आहेत.
-
समीर यांच्या बहिणीच नाव यास्मीन वानखेडे आहे.
-
क्रांतीने स्टिकरची रांगोळी घराच्या बाहेर लावली आहे.
-
या फोटोत दिवाळीचा आनंद हा क्रांतीच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
-
क्रांतीने तिचे घर दिव्यांनी सजवले आहे.(Photo Credit : Kranti Redkar Instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”