-
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
प्रियांका ही आता एक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी झाली आहे. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही तिने नाव कमावलं आहे.
-
पण तरीही प्रियांका भारतातील सर्व सण-उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करतात. तिच्यासोबत तिचा पती निक जोन्सही सर्व सण साजरे करतो.
-
सध्या प्रियांका लॉस एंजेलिसमध्ये असली तरी ती त्या ठिकाणी दिवाळी साजरी करताना दिसत आहे.
-
तिने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर पारंपारिक वेशातील फोटो शेअर केले आहेत.
यावर तिने “दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, सर्वांना खूप खूप प्रेम आणि आनंद. या सणाची सुरुवात फार कृतज्ञतेने आणि प्रेमाने करुया,” अशी कॅप्शन शेअर करताना दिली आहे. -
यात तिने प्रियांकाने फ्लोरल प्रिंटमधील पांढऱ्या रंगाचा लेहंगा आणि ऑफ शोल्डर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
विशेष म्हणजे यावर मिरर वर्क करण्यात आले आहे.
-
प्रियांकाचा हा लूक पाहून तिचे लाखो चाहते घायाळ झाले आहेत.
-
प्रियांकाचा हा लेहंगा पाहून निक जोन्सही तिच्यावर फिदा झाला आहे. त्याने तिच्या फोटो खाली ‘फायर’ इमोजी टाकत कमेंट केली आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन