-
अभिनेता मिलिंद सोमणने अभियन आणि मॉडेलिंगमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केलीय.
-
मिलिंद सोमण मॉडेलिंगसोबतच त्याच्या फिटनेस, न्यूड फोटोशूट आणि २५ वर्ष लहान मुलीशी लग्न अशा अनेक कारणांमुळे कायमच चर्चेत राहिला आहे.
-
मिलिंदचा आज ५६वा वाढदिवस आहे.
-
मलिंदने एक फोटो शेअर करत स्वत:ला ५६व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.
-
मिलंद सोमणने मॉडेलिंगने करिअरची सुरुवात केली होती. करियरच्या सुरुवातीलाच काही बोल्ड फोटोशूटमध्ये तो चांगलाच चर्चेत आला होता.
-
१९९५ सालामधील एका फोटोमुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. मिलिंद आणि मॉडेल मधु सप्रे यांचा एक न्यूड फोटो यावेळी प्रसिद्ध झाला होता. या फोटोमुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता.
-
यामुळे मिलिंद विरोधात निदर्शन करण्यात आली होती. तर १४ वर्ष कोर्ट केस सुरु राहिली होती.
-
त्यानंतर १९९५ सालामध्येच आलेल्या अलिशा चिनॉयच्या ‘मेड इन इंडिया’ या अल्बममध्ये मिलिंद सोमण झळकला.
-
या गाण्यातील मिलिंदच्या हॅण्डसम लूकवर लाखो तरुणी फिदा झाल्या.
-
या गाण्यापासून मिलिंदचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने वाढला.
-
त्यानंतर मिलिंद त्याच्या फोटोशूटमुळे कायमच चर्चेत राहिला.
-
२००६ सालामध्ये त्याने ‘वॅली ऑफ फ्लॉवर्स’ सिनेमातील फ्रेंच को-स्टार मेलेन जाम्पनोई सोबत लग्न केलं होतं. मात्र त्यांचं नात फार काळ टिकलं नाही.
-
त्यानंतर मिलिंद अभिनेत्री सहाना गोस्वामीला डेट करू लागला. सहाना मिलिंदहून २१ वर्ष लहान होती. दोघं जवळपास ४ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.
-
त्यानंतर मिलिंद सोमण अधिक चर्चेत आला तो त्याच्यापेक्षा २५ वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोवंरसोबतच्या रिलेशनशीपमुळे
-
काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर मिलिंद आणि अंकिताने २२ एप्रिल २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली.
-
मिलिंद आणि अंकिताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
-
तर अनेकदा अंकिता आणि मिलिंद रोमॅण्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतात.
-
मिलिंद सोमण त्याच्या फिटनेससाठी देखील ओळखला जातो.
-
वयाच्या ५६ व्या वर्षीदेखील तो व्यायाम करत फिटनेसकडे लक्ष देत असल्याचं पाहायला मिळतं.
-
सोशल मीडियावरून अनेक फिटनेसचे व्हिडीओ शेअर तो तरुणांना प्रोत्साहन देत असतो.
-
याशिवाय नुकत्याच आलेल्या काही वेब सीरिजचमध्ये हटके भूमिका साकारत मिलिंदने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (all Photo-Instagram@milindrunning)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”