-
भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक कर्णधार विराट कोहलीचा आज वाढदिवस…
-
विराट हा मैदानावर आणि मैदानाबाहेर कायमच चर्चेत असतो.
-
विराटबरोबरच त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माही कायमच चर्चेत असते.
-
‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून अभिनेत्री अनुष्का शर्माने कलाविश्वात पदार्पण केले.
-
निखळ हास्य आणि उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर अनुष्काने कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं.
-
लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीने क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली.
-
विशेष म्हणजे या दोघांची लग्नाची जितकी चर्चा रंगली तितकीच त्यांच्या अफेअर्सचीही रंगली होती.
-
फार कमी जणांना माहित असेल या दोघांनी लग्न करण्यापूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता.
-
विराट आणि अनुष्कादेखील पहिल्यांदा जेव्हा भेटले, तेव्हा त्यांच्यात नक्की काय संवाद घडला याबाबत विराटने वर्षभरापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता.
-
२०१३ मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरातीसाठी हे दोघे पहिल्यांदा भेटले.
-
त्या भेटीबाबत बोलताना विराटने, “मी पहिल्या वेळी जेव्हा अनुष्काला भेटलो, तेव्हा मी तिच्याशी गंमतीशीर पद्धतीने हलक्या फुलक्या शब्दामध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला,” असं सांगितलं.
-
“अनुष्काला पहिल्यांदा भेटतो तेव्हा मी खरं तर थोडा नर्व्हस होतो, म्हणून मी एक जोक क्रॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नक्की काय बोलावे, काय करावे हे मला कळत नव्हतं,” असं विराट म्हणाला.
-
आपली पहिली भेटच शूटिंगच्या सेटवर झाल्याचे सांगताना विराटने, “मी शूटिंगच्या सेटवर होतो. मला तिच्यासोबत जाहिरातीचं शूटिंग करायचं होतं. त्यामुळे माझ्या मनात थोडी भीती नक्कीच होती,” अशी प्रांजळ कबुलीही दिली.
-
विराट आणि अनुष्काने डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केलं.
-
लग्नापूर्वी या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.
-
मात्र एकमेकांना डेट करत असताना या दोघांनी २०१५ मध्ये ब्रेकअप केला होता.
-
इतकंच नाही तर त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलोही केलं होतं.
-
विराटला अनुष्कासोबत २०१५ मध्येच लग्न करायचं होतं. मात्र त्यावेळी अनुष्काला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं.
-
त्यामुळे तिने विराटच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता.
-
याचकारणास्तव या दोघांमध्ये वाद झाले आणि त्यांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं.
-
इतकंच नाही तर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलोदेखील केलं. मात्र त्यांच्यातील हा वाद फार काळ टिकला नाही.
-
ते एकमेकांशिवाय राहू शकत नसल्याची जाणीवर दोघांना झाली आणि ते पुन्हा एकत्र आले.
-
विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केलं.
-
या दोघांच्या लग्नाच्या प्रचंड चर्चा रंगल्या होत्या.
-
अनुष्काने ११ जानेवारीला एका गोंडस मुलीला जन्म दिला.
-
विराट आणि अनुष्काने त्यांच्या बाळाचं नाव वामिका असं ठेवलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : विराट आणि अनुष्का / इन्स्टाग्राम)

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…