-
बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड या दोन्ही कलाविश्वामध्ये सध्याच्या घडीला लोकप्रिय असलेली जोडी म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास.
-
सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली ही जोडी कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी इन्स्टाग्रामवर फोटो, व्हिडीओज शेअर करत असतात.
-
कधी कोणत्या सीरिजचं चित्रीकरण तर कधी कोणत्या चित्रपटाच्या चित्रीकरणात प्रियांका व्यस्त असते. तरी देखील ती भारतीय सणांना कधीच विसरली नाही.
-
प्रियांका भारतातील सर्व सण-उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करते.
-
प्रियांकाने यंदाची दिवाळी ही लॉस एंजलिसमध्ये असलेल्या तिच्या घरात साजरी केली आहे.
-
प्रियांका हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
यावेळी प्रियांकाने पूर्ण श्रद्धेने लक्ष्मी देवी आणि गणपतीची पूजा केली.
-
या पूजेत प्रियांकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर पती निक जोनसने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.
-
हे फोटो शेअर करत “या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः देवी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांची कृपा आमच्या घरात आमंत्रित करते”, असं कॅप्शन दिले आहे.
-
या आधी प्रियांकाने दिवाळीच्या पार्टीचे काही फोटो शेअर केले होते.
-
या फोटोत प्रियांकाने लहेंगा परिधान केला आहे.
-
हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
-
प्रियांका कायम चाहत्यांसोबत जोडून राहण्याचा प्रयत्न करत असते.
-
प्रियांका लवकरच ‘जी ले जरा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियांका चोप्रा / इन्स्टाग्राम)

बुलढाण्यातील केस गळतीचे रहस्य उलगडले; रोजच्या आहारातील अन्न ठरतंय कारणीभूत, जाणून घ्या कारण