-
भारताचा सलामीवीर फलंदाज के. एल. राहुलने टी-२० वर्ल्डकपमध्ये स्कॉटलंडविरुद्ध दमदार खेळी करण्याबरोबरच एक मोठा खुलासा केला आहे.
-
के. एल. राहुलचा हा सामना पाहण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी प्रत्यक्षात मैदानात उपस्थित होती.
-
या सामन्यानंतर के. एल. राहुलने अथियासोबतचं नातं पहिल्यांदाच सार्वजनिकपणे मान्य करत एक पोस्ट शेअर केली.
-
अथियाचा वाढदिवस ५ नोव्हेंबर रोजी असतो, त्यामुळे के. एल. राहुलने ही खेळी अथियाला भेट केली.
राहुलने अथियासोबतचे दोन फोटो पोस्ट करत “हॅपी बर्थ डे माय लव्ह,”असं म्हटलं आहे. -
विशेष म्हणजे या फोटोवर बर्थ डे गर्ल असणाऱ्या अथियानेही कमेंट केली होती.
-
अथियाने इमोजी वापरत कमेंट केली असून व्हाइट हार्ट आणि पृथ्वीचा इमोजी वापरला आहे.
-
यामधून तिला प्रेम आणि तूच माझं जग आहेस असं सूचित करायचं आहे.
-
यानंतर अथिया शेट्टी आणि के. एल. राहुल हे दोघेही सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.
-
यानतंर अथिया शेट्टी नक्की कोण? असा प्रश्न समोर येत आहे.
-
अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे.
-
अथिया शेट्टी ही अभिनयापेक्षा तिच्या फॅशन सेन्समुळे जास्तच चर्चेत असते.
-
अथियाने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
अथियाचे वडील सुनील शेट्टी हे बॉलिवूड अभिनेते आणि चित्रपट निर्माते आहेत.
-
तर अथियाची आई माना शेट्टी ही एक बिझनेस वुमन आहे.
-
अथियाचा जन्म ५ नोव्हेंबर १९९२ रोजी मुंबईत झाला.
-
अथियाने अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे या ठिकाणी तिचे शिक्षण घेतले.
-
त्यानंतर तिने न्यूयॉर्क फिल्म अॅकेडमीमधून तिचे ग्रॅज्युऐशन पूर्ण केले.
-
तिला बालपणापासूनच बॉलिवूडमध्ये काम करण्याची प्रचंड इच्छा होती.
अथियाला अभिनयासह नृत्याचीही आवड आहे. तिने प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसूजा यांच्याकडून नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. अथियाने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने ‘हीरो’ चित्रपटात पहिल्यांदा काम केले. -
यानंतर ती ‘मुबारक, नवाबजादे ‘मोतीचूक चकनाचूर’ यासारख्या अनेक चित्रपटांत काम केले.
-
हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले नसले तरी तिच्या अभिनयाचे मात्र सर्वत्र कौतुक केले जाते.
-
अथियाला अद्याप तिला सिनेसृष्टीत फारसे यश मिळालेले नाही.
-
अथिया आणि इलियाना डिक्रूज या दोघीही फार चांगल्या मैत्रिणी आहेत.
तर कृष्णा श्रॉफ आणि अथिया शेट्टी या शाळेपासून चांगल्या मैत्रिणी आहेत.

बुलढाण्यातील केस गळतीचे रहस्य उलगडले; रोजच्या आहारातील अन्न ठरतंय कारणीभूत, जाणून घ्या कारण