-
बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचे लाखो चाहते आहेत. त्यांनी आता किंग खान म्हणजेच शाहरुखला एक सल्ला दिला आहे.
-
महेश नेहमीच मोकळेपणाने त्यांच मत मांडताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख खानला एक सल्ला दिला आहे.
-
यासोबतच त्यांनी शाहरुखची तुलना ही बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रणवीर सिंगशी केली आहे.
-
‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत महेश यांनी त्यांचा आवडता अभिनेता आणि आणखी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. महेश यांचा आवडता अभिनेता हा रणबीर कपूर आहे कारण तो एक उत्तम अभिनेता आहे असे ते म्हणाले.
-
पुढे ते म्हणाले, “मी सलमानला भाऊ मानतो म्हणून मी त्याचं नाव घेणार नाही. तो त्याच्या कामाला घेऊन प्रामाणिक आहे. एक अभिनेता ज्याने त्याच्या अभिनय कौशल्याना न्याय दिला नाही तो म्हणजे शाहरुख खान.”
-
शाहरुखला त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचे नाही, त्याला फक्त त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये रहायचे आहे. त्याला असं वाटतं की त्याची लव्हर बॉयची भूमिका असलेले चित्रपट प्रेक्षकांना आवडतात, पण असं नाही, असे महेश म्हणाले.
-
पुढे महेश म्हणाले, “आज लोक म्हणतील शाहरुखचे चित्रपट चालतात तर मी असं नाही बोलणार, कारण तसं नाही आहे. शाहरुख तिच भूमिका साकारतोजी रणबीर कपूर आणि रणवीर सिंग साकारतो.”
-
“मग लोकं शाहरुखचे चित्रपट का पाहतील? प्रेक्षकांना शाहरुखची अशी भूमिका पाहायची आहे, जी पाहिल्यानंतर ते बोलतील ती शाहरुखची भूमिका होती. वय पण ठीक आहे, सर्वकाही बरोबर आहे. शाहरुखने काहीतरी वेगळं करावं असं महेश यांना वाटतं,” असे वक्तव्य महेश यांनी केले.
-
“शाहरुख एक उत्कृष्ट अभिनेता आहे. रणवीर सिंग हा देखील चांगला अभिनेता आहे पण ज्या अभिनेत्यामध्ये खूप पुढे जाण्याची क्षमता आहे तो म्हणजे आयुष शर्मा”, असे महेश मांजरेकर म्हणाले.
-
महेश यांनी सलमान खान आणि आयुष शर्माचा आगामी चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’चे दिग्दर्शन केले आहे.
-
‘अंतिम’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही प्रेक्षकांनी त्याला पसंती दिली आहे. तर काहींनी ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटावरून ‘अंतिम’ला ट्रोल केले आहे.
-
‘अंतिम’ हा चित्रपट २६ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (All Photo Credit : File Photo)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख