-
वडील आणि मुलीचं नातं हे फार खास असतं. अनेकदा आई आणि मुलांच्या नात्याबद्दल बोललं जातं मात्र वडिलांच्या प्रेमाबद्दल फारच कमी वेळा बोललं जातं. अगदी चित्रपट असो किंवा खऱ्या आयुष्यातील चर्चा असो वडीलांचे प्रेम हा विषय चर्चेच्याबाबतीत आईच्या प्रेमाच्या एक पाऊल मागेच असतो. मात्र सध्या बॉलिवुडमधील झक्कास अभिनेता अनिल कपूर हा चर्चेत आहे त्याने बाप म्हणून केलेल्या एका पोस्टमुळे.
-
तसे अनिल कपूर हे त्यांच्या फिटनेससाठी कायमच चर्चेत असतात. यंदा मात्र कारण थोडं भावनिक आहे.
-
खरं तर अनिल कपूर हे सोशल नेटवर्किंगवर फारच सक्रीय आहेत. हा आज त्यांनी पोस्ट केलेला फोटो हा मंडे मोटीव्हेशन म्हणून शेअर केलाय.
-
तरी या फोटोऐवजी काल म्हणजेच रविवारी अनिल कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोची चर्चा अधिक आहे. त्याला कारणही तसं खासं आहे.
-
झालं असं की, अनिल कपूर यांनी नुकतीच दिवाळीनिमित्त एका मोठी पार्टी आयोजित केलेली.
-
यामध्ये बोनी कपूर, जान्हवी कपूर, खुशी कपूर, अर्जून कपूर यांच्यासहीत अनेक कलाकार सहभागी झाले होते. मात्र या सेलिब्रेशनदरम्यान अनिल कपूर यांचं मन मुलींमध्ये अडकल्याचं दिसलं.
-
सोनम आणि रिया अशा दोन मुली अनिल कपूर यांना आहेत. दोन्ही मुलींची लग्नं झालेली आहेत.
-
सोनम सध्या पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये असते तर अनिल यांची दुसरी मुलगी रिया सुद्धा लग्न करुन सासरी नांदायला गेलीय.
-
रियाचं लग्न करण बूलानीसोबत झालं आहे.
-
त्यामुळे सध्या मुंबईतील अनिल कपूर यांच्या घरी ते आणि त्यांची पत्नी दोघेच राहतात.
-
दोन्ही मुली यंदा दिवाळीला अनिल कपूर यांच्यासोबत नसल्याने त्यांना आपल्या मुलींची फार आठवण येतेय, हे त्यांनी थेट इन्स्टाग्राम पोस्टवरुन सांगितलं आहे.
-
अनिल कपूर यांनी आपल्या मुलींचे लहानपणीचे दोन आणि एक मुलींच्या लग्नाच्या वेळेस काढलेला असे एकूण तीन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिला या दोघांच्या लहानपणीचा असून एका वाढदिवसाच्या पार्टीमधील आहे. फोटोमध्ये सोनम रियाला केक भरवताना दिसत आहे.
-
तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघी बहिणी दिसत आहेत. हा फोटोही या दोघींच्या बालपणीचा आहे.
-
तिसरा फोटो हा मागील काही वर्षांमध्ये काढलेला फोटो असून यामध्ये दोन्ही बहिणी अगदी नटून थटून बसलेल्या असून अनिल कपूर स्वत: छान पारंपारिक कपड्यांमध्ये दिसत आहेत.
-
या फोटोला कॅप्शन देताना अनिल कपूर यांनी, “मला तुम्हा दोघींची रोज आठवण येते, पण आज जरा तुमची जास्तच आठवण येतेय,” असं म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी हार्टचा इमोजीही वापरलाय.
-
रियाने या फोटोवर प्रेमळ आणि इमोशनल इमोजी शेअर करत रिप्लाय दिलाय.
-
तर सोनमनेही या फोटोवर कमेंट करुन, ‘मीस यू डॅड’ असं म्हटलंय.
-
या फोटोवर अनेक व्हेरिफाइड अकाऊंटवरुन रिप्लाय आला असून यामध्ये नितू कपूर, झोया अख्तर यांच्या रिप्लायचाही समावेश आहे. सोनम आणि रियाच्या आईनेही या फोटोंवर कमेंट केलीय. (सर्व फोटो अनिल कपूर यांच्या ट्विटरवरुन साभार)
‘ठरलं तर मग’मध्ये एन्ट्री घेणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता! यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो