बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेता सैफ अली खान सध्या त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चांगलेच चर्चित आहे. बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. -
या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि राणी जवळपास १२ वर्षानंतर एकत्र काम करताना दिसणार आहेत
-
याच पार्श्वभूमीवर नुकतंच सैफ आणि राणीने बॉलिवूड अभिनेता रणबीर सिंह होस्ट करत असलेल्या बिग पिक्चर या क्वीज शोमध्ये हजेरी लावणार आहेत.
-
यावेळी रणबीरने राणीला चित्रपटासह तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले.
-
यादरम्यान सैफने राणीसोबत तिचे हिट गाणे ‘आती क्या खंडाला’ यावर डान्सही केला.
-
सध्या या शोचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.
-
या शो दरम्यान राणीने तिला बॉलिवूडमधील एका सुपरहीट अभिनेत्यावर क्रश होता, याचा खुलासा केला.
-
‘गुलाम’ या चित्रपटादरम्यान मला अभिनेता आमिर खानवर माझा क्रश होता, असे राणी म्हणाली.
-
“मला ‘गुलाम’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान आमिर खानवर माझे प्रेम जडले होते. मी गुलाम चित्रपटाच्या शूटींगदरम्यान फार गोंधळली होती,” असे राणी म्हणाली.
-
“मी ‘गुलाम’ आणि ‘कुछ कुछ होता है’ या दोन्हीही चित्रपटातून खूप काही शिकले आहे. मी आमिर खान, शाहरुख खान या कलाकारांसोबत काम केल्याचा मला गर्व आहे.” असेही तिने सांगितले.
-
यावेळी रणबीरने ‘कुछ कुछ होता है’ मधील काही सीन हे रिक्रीएट केले.
-
‘बंटी और बबली’ हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते.
-
तसेच अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन देखील चित्रपटात झळकले होते. आता जवळपास १६ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता ‘बंटी और बबली २’ या चित्रपटात अभिषेक ऐवजी सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. -
त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

‘ठरलं तर मग’मध्ये एन्ट्री घेणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता! यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो