-
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोघीही कायमच प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असतात.
-
सध्या या कूपर बहिणी चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे जान्हवीने तिच्या अकाऊंटवरुन पोस्ट केलेले फोटो.
-
या फोटोंमध्ये जान्हवी आणि खुशी एकत्र दिसत आहेत.
-
या फोटोमध्ये या दोघींबरोबर अन्य एक तरुणीही दिसत आहे. हा तरुण नक्की कोण आहे हे कॅप्शनमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
-
मात्र जान्हवीसोबतच्या दुसऱ्या एका फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव अक्षत रंजन असून तो जान्हवीचा एक्स बॉयफ्रेण्ड असल्याचं सांगण्यात येत आहे.
-
तरी जान्हवीचे हे फोटो एक्स बॉयफ्रेण्डमुळे चर्चेत आहेत असं नाही. या तरुणामुळे हे फोटो चर्चेत नाहीत तर एका वेगळ्याच कारणामुळे हे फोटो चर्चेत आहेत.
-
व्हायरल झालेले हो फोटो जान्हवीने खुशीच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या पार्टीनंतर शेअर केले आहेत.
-
खुशी नुकतीच म्हणजे ५ नोव्हेंबर रोजी, २१ वर्षांची झाली.
-
खुशीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये या बहिणींनी त्यांच्या जवळच्या मित्र मैत्रिणींसोबत फार धम्माल केल्याचं फोटोंमधून दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये जान्हवी ट्यूब टॉपमध्ये दिसत आहे.
-
जान्हवी फारच सुंदर दिसत असली तरी एका फोटोमध्ये दिलेली पोज ही चर्चेचा विषय ठरतेय.
-
ट्यूब टॉप घालून जान्हवी एका खुर्चीच्या आर्म रेस्टवर पायावर पाय ठेऊन बसलीय. या खुर्चीवर तिचा एक्स बॉयफ्रेण्ड बसला असून मांडीवर हात ठेऊन खाली तिची बहिणी बसली आहे.
-
अनेकांना ही पोज पसंत पडलेली नाहीय.
-
इन्स्टाग्रामवर अनेकांनी या पोजवरुन नाराजी व्यक्त करणाऱ्या कमेंट नोंदवल्यात.
-
चाहत्यांनी हे फोटो फारच सुंदर आणि हॉट असल्याचं म्हटलं असलं तरी काहींनी आपल्या भावंडांसोबत या अशा पोज कोण देतं असा प्रश्न उपस्थित केलाय. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

‘ठरलं तर मग’मध्ये एन्ट्री घेणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता! यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो