-
दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. कलाकारांनी सोशल मीडियावर कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करतानाचे फोटो शेअर केले होते. त्यासोबतच चाहत्यांना देखील शुभेच्छा दिल्या होत्या. पण काही कलाकारांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गाड्या खरेदी केल्या आहेत. चला पाहूया या यादीमधील काही कलाकार आणि त्यांनी खरेदी केलेल्या गाड्या…
-
अभिनेत्री सायली संजीव ही कायमच चर्चेत असते.
-
सायलीने दिवाळीमध्ये नवी कार खरेदी केली आहे. कार सोबतचा फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
-
शर्मिष्ठा राऊतने दिवाळीत नवी गाडी खरेदी केली आहे.
-
गाडीसोबतचा फोटो शेअर करत तिने ‘माझं पाडवा Gift… खूप वर्षांनी two wheeler चालवणार मी.. कॉलेजच्या दिवसांची पुन्हा आठवण झाली’ असे कॅप्शन दिले आहे.
-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत काम करणारी गिरजा प्रभूने दिवाळीत नवी कार खरेदी केली आहे. कार सोबतचा फोटो शेअर करत तिने ‘माझे स्वप्न पूर्ण झाले’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
-
‘देवा श्री गणेशा’ मालिकेत काम करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने नवी कार खरेदी केली आहे.
-
तिने कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी.
-
हार्दिकने दिवाळीत नवी कार खरेदी केली आहे.
-
तसेच ‘तुझ्यात जीव रंगला’मधील अभिनेता अमोल नाईकने देखील दिवाळीत नवी कार खरेदी केली आहे.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल