-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या चर्चा राज कुंद्राला पार्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यामुळे सुरु झाल्या होत्या. त्यानंतर शिल्पा आणि राज यांच्या नात्यामध्ये फूट पडली असल्याचे देखील म्हटले जात होते.
-
आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे एकत्र आले असून हिमाचलमध्ये देवीचे दर्शन घेताना दिसत आहेत.
-
शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये शिल्पा पतीसोबत हिमाचलमधील धर्मशाळा येथे गेल्याचे दिसत आहे.
-
शिल्पाने तेथे पतीसोबत चामुंडा देवी आणि ज्वाला देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे.
-
सोमवारी शिल्पा पती राज कुंद्रा आणि मुलांसोबत चामुंडा मंदिरात पोहोचली.
-
तिने तेथे पूजा केली. तसेच कुटुंबीयांसोबत नंदिकेश्वर धाममध्ये भगवान शंकराची आराधना केली.
-
शिल्पाने चामुंडा देवी आणि शिव मंदिरचा इतिहास जाणून घेतला.
-
यापूर्वी शिल्पा शेट्टी वैष्णोदेवीच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती.
-
शिल्पा शेट्टीने देवीच्या दर्शनासाठी १३ किमी पायपीट केली होती. आता शिल्पा कुटुंबीयांसोबत चामुंडा देवीचे दर्शन घेतले आहे.

४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार