-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
जान्हवी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तिचे लाखो चाहते आहेत.
-
ती नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
जान्हवी ही नेहमीच तिच्या चित्रपटांसह विविध कारणामुळे चर्चेत असते.
-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं नातं किती खास होतं हे साऱ्यांनाच माहित आहे.
-
पण श्रीदेवी यांना त्यांच्या दोन्ही मुलींना अभिनेत्री बनवण्याची अजिबात इच्छा नव्हती.
-
विशेष म्हणजे आपल्या दोन्ही मुलींनी सिनेसृष्टीपासून दूर रहावे असे त्यांना कायम वाटायचे.
-
एकदा जान्हवीने मुलाखतीदरम्यान याबाबत खुलासा केला होती. “मी अभिनय क्षेत्राऐवजी एका वेगळ्या क्षेत्रात रस घ्यावा, असे माझ्या आईला नेहमी वाटायचे,” असे जान्हवी एकदा म्हणाली होती.
-
प्रत्येक पालक त्यांच्या मुलांसाठी विविध स्वप्न पाहत असतात. जेव्हा त्यांचे मूल करिअरचा विचार करत असते तेव्हा त्याने काय करावे याची योजना पालकांनी आधीच केलेली असते.
-
एक आई म्हणून श्रीदेवीनेही याबाबतची एक योजना तयार केली होती. ती तिच्या मुलींना चित्रपटसृष्टीत पाठवण्यास अजिबात तयार नव्हती.
-
जान्हवीने अभिनेत्री होण्यापेक्षा डॉक्टर व्हावे, असे तिला नेहमी वाटायचे.
-
पण त्यानंतर जान्हवीने सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला आणि श्रीदेवीला तो निर्णय मान्य करावा लागला. जान्हवीने याबाबत एका मुलाखतीत खुलासा केला होता.
-
जान्हवीने दिलेल्या माहितीनुसार, “मी लहान असताना माझ्या आईची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावे. पण मी त्यावेळी आईला स्पष्ट नकार दिला होता.”
-
“मला माहिती नाही का पण मी स्वत:च माझ्या आईला सांगितले की, आई मला माफ कर, पण डॉक्टर बनण्याइतकी बुद्धी, समज माझ्याकडे नाही,” असे तिने सांगितले.
-
“माझा हा निर्णय ऐकल्यानंतरही माझ्या आईने मला सिनेसृष्टीत करिअर करण्यास नकार दिला होता,” असे जान्हवी म्हणाली.
-
पण त्यानंतर माझे वडील बोनी कपूर यांनी तिची समजूत घातल्यानंतर तिने या निर्णयला होकार दिला, असे तिने सांगितले.
-
मी माझ्या आईच्या म्हणणे जरी ऐकले नसले तरी, सिनेसृष्टीत करिअर करण्यासाठी मला प्रचंड मेहनत करावी लागली.
-
“माझे आई-वडील आता जिथे आहेत तिथे पोहोचण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागणार आहे. पण सिनेसृष्टीत मी स्वत:ला सिद्ध केले आहे, याचा मला प्रचंड आनंद आहे,” असे जान्हवीने म्हटले.
-
जान्हवीने २०१८ मध्ये ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
त्यानंतर ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’मध्ये जान्हवी मुख्य भूमिकेत दिसली होती. ‘गुंजन सक्सेना’ चित्रपटामुळे जान्हवीला खरी लोकप्रियता मिळाली होती.

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन