-
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या हटके स्टाइलसाठी ओळखला जातो. हटके आणि विचित्र कपड्यांमुळे तो कायम चर्चेत असतो. मात्र आणखी एक असा अभिनेता जो रणवीरलादेखील स्टाइलमध्ये मागे टाकत आहे आणि या अभिनेत्याचं नाव आहे साहिल सलाथिया.
-
साहिल सलाथिया एक अभिनेता तसचं मॉडेल आहे.
-
साहिलने अनेक वेब सीरिज तसचं बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलंय.
-
साहिल त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या हटके आणि विचित्र फॅशनमुळे तसचं कपड्यांमुळे जास्त चर्चेत असतो.
-
साहिल सलाथिया लांब स्कर्टमधील फोटोशूटमुळे अनेकदा चर्चेत आला आहे.
-
साहिलने स्कर्ट परिधान करून अनेक फोटोशूट केले आहेत.
-
हे फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केले आहेत.
-
हटके फॅशनसाठी रणवीर सिंहची नेहमी चर्चा होत असली तरी साहिल सलाथियाचं इन्स्टाग्राम अकाऊंट चेक केल्यास साहिलने रणवीरलाही टक्कर दिली असल्याचं लक्षात येत.
-
या फोटत साहिलने चक्क एक हिऱ्यांचा नेकलेस घातला आहे.
-
तर या फोटोत त्याने लेदर जॅकेट परिधान केलं असून गळ्यात मोत्याची माळ घातली आहे.
-
या फोटोत त्याने बोटांमध्ये अंगठ्या घातल्या आहेत तर नखांनाही नेलपेंट लावल्याचं दिसतंय.
-
वेगवेगळ्या लूक मधील साहिलचे अनेक फोटो त्याने शेअर केले आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच चर्चेत असलेल्या पौरशपूर वेब सीरिजमध्ये साहिलने काम केलंय.
-
पानिपत सिनेमात त्याने शमशेर बह्हादूर ही भूमिका साकारली होती.
-
हसमुख आणि एव्हरेस्ट सारख्या टेलिव्हिजन शोमध्ये ही त्याने काम केलंय.(All Photos- Instagram@sahilgsalathia)
Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण