-
‘सिटी लाईट्स’या चित्रपटातील अभिनेता राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा येत्या काही दिवसात विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाच्या सोहळ्याची सुरुवात काल १३ नोव्हेंबरला मेहंदी सोहळ्यापासून झाली. याचे अनेक फोटो समोर आले आहेत.
-
राजकुमार राव आणि पत्रलेखा हे दोघेही १४ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे.
-
हे दोघेही चंदीगडमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न करणार आहे.
-
मुंबईत या दोघांच्या लग्नाचे कोणतेही कार्यक्रम होणार नाही.
-
राजकुमार राव आणि पत्रलेखा या दोघांचे लग्न हे चंदीगडमधील ओबेरॉय सुखविलास स्पा रिसॉर्टमध्ये होणार आहे.
-
राजकुमार राव याच्या लग्नामुळे चंदीगडमधील ओबेरॉय सुखविलास स्पा रिसॉर्ट चर्चेत आले आहेत.
-
ओबेरॉय सुखविलास स्पा रिसॉर्ट हे चंदिगडमधील फार अलिशान रिसोर्ट आहे.
-
याचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
हे रिसॉर्ट ८०० एकर जागेत वसलेले आहेत.
-
ही संपूर्ण संपत्ती माजी मुख्यमंत्री बादल यांच्या कुटुंबाची आहे.
-
कोहिनूर व्हिला हा या रिसॉर्टमधला सर्वात महागडे रिसॉर्ट असल्याचे बोललं जात आहे.
-
या व्हिलाच्या एका रात्रीचे भाडे सुमारे ६ लाख रुपये आहे.
-
तर एका बेडरूमच्या लक्झरी व्हिलाचे भाडे दर रात्र २ लाख रुपये आहे.
-
तसेच यातील सर्वात स्वस्त खोलीची किंमत प्रतिरात्र ३० हजार रुपये आहे.
-
दरम्यान‘सिटी लाईट्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.
-
या चित्रपटात राजकुमार आणि पत्रलेखा यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.
-
राजकुमार आणि पत्रलेखा गेल्या १० वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघेही लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन