-
अभिनेता राजकुमार राव अखेर विवाहबंधनात अडकला आहे. त्याने प्रेयसी पत्रलेखासोबत सप्तपदी घेतली.
-
या दोघांनी सोमवारी १५ नोव्हेंबरला लगीनगाठ बांधली.
-
राजकुमार रावने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा साखरपुडा १३ नोव्हेंबरला पार पडला. यानंतर १४ नोव्हेंबरला मेहंदी आणि संगीत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
-
३१ ऑगस्ट १९८४ रोजी गुरुग्रामच्या अहीरवाल येथे राजकुमार रावचा जन्म झाला.
-
‘फिल्म अॅ्ण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (FTII) मधून पदवी घेतल्यानंतर तो मुंबईला आला.
-
अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला.
-
‘लव्ह, सेक्स और धोका’ हा पहिला चित्रपट केला.
-
या चित्रपटातील त्याचा अभिनय पाहिल्यानंतर त्याच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.
-
‘सिटी लाईट्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.
-
या चित्रपटात राजकुमार आणि पत्रलेखा यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.
-
‘एफटीआयआय’मध्येच दोघांची भेट झालेली आणि एका शॉर्ट फिल्मच्या सेटवर दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.
-
राजकुमार आणि पत्रलेखा गेल्या १० वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
-
गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : राजकुमार राव / इन्स्टाग्राम)

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन