-
अभिनेता संग्राम साळवी आणि त्याची पत्नी खुशबू तावडे यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
-
खुशबूने एका गोड चिमुकल्याला जन्म दिला आहे.
-
ही गुड न्यूज संग्रामने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.
-
सोबतच त्याने त्याच्या मुलाचं नावदेखील सांगितलं आहे.
-
हा फोटो शेअर करत त्याने बाळाचं नाव राघव ठेवल्याचं जाहीर केलं आहे.
-
संग्रामची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
‘देवयानी’ या मालिकमुळे संग्राम साळवी हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले.
-
या मालिकेतील ‘तुमच्यासाठी काय पण’ हा त्याचा संवाद चांगलाच गाजला होता.
-
खुशबू तावडे केवळ मराठी इंडस्ट्रीतच नाही, तर हिंदी इंडस्ट्रीतदेखील तितकीच प्रसिद्ध आहे.
-
‘तेरे बीन’ या मालिकेतील तिच्या अभिनयाला विशेष पसंती मिळाली होती.
-
चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेल्या ‘सांजबहर’मध्ये संग्राम आणि खुशबूने एकत्र काम केले होते.
-
मार्च २०१८ सालामध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.
-
खुशबूने ‘तू भेटशी नव्याने’, ‘पारिजात’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले असून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘प्यार की ये एक कहानी’, ‘तेरे लिए’, ‘तेरे बिन’ यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली.
-
संग्रामने मालिकांसोबतच काही मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : संग्राम साळवी आणि खुशबू तावडे / इन्स्टाग्राम)
‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल