-
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दियाने ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
दियाने कमी चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांची मने जिंकली आहेत.
-
दियाच्या वडिलांचे नाव फ्रँक हैंड्रिच असे असून ते एक जर्मन कलाकार होते. तर दियाची आई दिपा या इंटिरिअर डिझायनर होत्या.
-
दियाची आई आणि वडिलांचे वैवाहिक जीवन फार गुंतागुंतीचे झाले होते. त्यामुळे दिया फक्त ५ वर्षाची असताना त्यांचा घटस्फोट झाला.
-
त्यानंतर तिचे वडील म्हणजेच फ्रँक यांनी दुसरे लग्न केले. तर दिपानेही हैद्राबादमधील अहमद मिर्झा यांच्यासोबत दुसरे लग्न केले. सध्या दिया ही त्यांचेच आडनाव लावते.
-
दियाने एका मुलाखतीत सांगितले की अहमद मिर्झा यांनी कधीच तिच्या बायोलॉजिकल वडील म्हणजेच फ्रँक यांची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही. या कारणामुळे तिचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे.
-
दियाने तिच्या सावत्र वडिलांचे म्हणजेच अहमद मिर्झा यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे दिया हैंड्रिच नाव बदलत दिया मिर्झा केले.
-
दियाने १८ वर्षांची असताना मिस एशिया पॅसिफिकचा खिताब जिंकला होता.
-
दियाने यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बिझनेसमॅन वैभव रेखीसोबत लग्न गाठ बांधली. या दोघांचे हे दुसरे लग्न होते.
-
अव्यान हा दियाचा पहिला मुलगा आहे. तर, वैभवची समायरा ही मुलगी आहे. दिया ‘संजू’ आणि ‘थप्पड’ या चित्रपटात दिसली होती. (Photo Credit : Dia Mirza Instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”