-
सेलिब्रिटी जोडप्यांच्या यादीत चाहत्यांना नेहमीच कपल गोल्स देण्यासाठी काही जोड्यांच्या नावाला पसंती देण्यात येते.
-
अशा या यादीत अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे रितेश देखमुख आणि जिनिलिया.
-
हिंदी आणि मराठी अशा दोन्ही कलाविश्वांमध्ये या जोडीवर नेहमीच सर्वांच्या नजरा खिळतात.
-
जिनिलियाने लग्नानंतर चित्रपटांतून ब्रेक घेतला आणि ती पूर्णपणे संसारात रमली.
-
जिनिलिया ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती नेहमीच तिचे विविध फोटो शेअर करत असते.
-
साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा, दिमाखाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे.
-
जिनिलियाने नुकतंच मराठमोळ्या लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
जिनिलियाने परिधान केलेल्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
-
रितेश आणि जिनिलिया या दोघांनीही एकाच वेळी अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती.
-
बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
विवाहबंधनात अडकल्यानंतर जिनिलियाने कलाविश्वातून काढता पाय घेतला, कुटुंबाकडे लक्ष देण्यास प्राधान्य दिलं.
-
(सर्व फोटो सौजन्य : जिनिलिया देखमुख / इन्स्टाग्राम)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन