-
हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री पूजा हेगडे ही कायमच चर्चेत असते.
-
नुकतेच अभिनेता प्रभास सोबतच्या तिच्या राधे श्याम या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले.
-
मात्र या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणारी पूजा सध्या तिच्या मलदीव ट्रीपमुळे चर्चेत आहे.
-
पूजा तशी सोशल मीडियावर फारच सक्रीय आहे.
-
कधी योगा करतानाचे फोटो तर कधी एखाद्या फोटोशूटमधील फोटो शेअर करत ती आपल्या चाहत्यांच्या सतत संपर्कात राहण्याचा, कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करत असते.
-
ज्याप्रमाणे चित्रपटांमधील हटके भूमिकांसाठी ती ओळखली जाते तशीच इन्साग्रामवर पूजा तिच्या हॉट आणि हटके फोटोंसाठी ओळखली जाते.
-
इन्स्टाग्रामवर पूजाला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या १ कोटी ५९ लाखांहून अधिक आहे.
-
तिच्या फॉलोअर्सची संख्या पाहूनच तुम्हाला तिच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येईल.
-
तसा तिने कोणतेही फोटो पोस्ट केले तरी त्यावर हजारोंच्या संख्येने लाइक्स आणि कमेंटस पडताना दिसतात.
-
मात्र सध्या पूजा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली असून ती तिच्या इन्स्टाग्रामवर तेथील काही खास फोटो पोस्ट करत आहे.
-
पूजाने मागील काही दिवसांमध्ये स्वत:चे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
-
मात्र पूजाच्या या हॉट फोटोंबरोबरच ती राहत असणाऱ्या अलिशान हॉटेलचीही चाहत्यांमध्ये बरीच चर्चा आहे.
-
पूजा राहत असलेलं हॉटेल हे मालदीवमधील काही महागड्या हॉटेल्सपैकी एक आहे.
-
सहलीसाठी गेलेली पूजा राहत असलेल्या हॉटेलचं एका रात्रीचं भाडं ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
-
पूजा मालदीवमध्ये हुवाफीन फुशी मालदीव्ज (Huvafen Fushi Maldives) या हॉटेलमध्ये थांबलीय.
-
पूजानेच तिच्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये या हॉटेलचं हॅण्डल टॅग केलं आहे.
आपण कुठे आहोत हे चाहत्यांना कळावं यासाठी तिने मालदीवबरोबरच नक्की आपण कोणत्या हॉटेलमध्ये थांबलोय हे सुद्धा कॅप्शनमध्ये टॅग्सच्या माध्यमातून सांगितलंय. -
या हॉटेलबद्दल पूजाच्या चाहत्यांमध्ये बरीच चर्चा दिसत असली तरी हे हॉटेल नक्की कसं आहे आणि त्याचं भाडं किती आहे हे आपण पाहूयात.
-
आधी या हॉटेलमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत यावर नजर टाकूयात.
-
हे हॉटेल सी व्हिला म्हणजेच समुद्रामधील हॉटेल प्रकारातील आहे.
-
हॉटेलमध्ये आऊटडोअर स्वीमिंग पूल देण्यात आला आहे.
-
आलीशान सूटसमोरचे हे छोट्या आकाराचे ओपन स्वीमींग पूल फारच आकर्षक आहेत.
-
त्याचबरोबर येथे स्पा, मसाज आणि फिटनेस सेंटरचीही सोय आहे.
-
इंटरनेट सुविधेपासून ते २४ तास सर्व्हिस देणारे कर्मचारी आणि इतर बऱ्याच सुविधा या हॉटेलमध्ये आहेत.
-
विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये गिफ्ट शॉप म्हणजेच भेटवस्तूंचं खास दुकानही आहे. हॉटेलच्या चहू बाजूंनी समुद्र असल्याने सगळीकडून सी व्ह्यूच आहे.
-
हा फोटोही हॉटेलच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरील असून हॉटेलच्या चहू बाजूंनी असे सुंदर सुमद्रकिनारे आहेत.
-
या हॉटेलमधून अशाप्रकारचा सनसेट दिसतो.
-
निसर्गाशी जोडलेलं राहण्याबरोबरच जेट स्कीसारख्या सुविधाही हॉटेलमध्ये आहेत.
-
इंटरनेटवरील माहितीनुसार हे एकमेव असं हॉटेल आहे ज्यात चार रेस्तराँ आहेत.
पूजा या हॉटेलमधील अनेक सेवांचा लाभ घेत असून अगदी स्वीमींग पूल ब्रेकफास्ट पासून वेगवेगळ्या गोष्टींचे फोटो ती शेअर करताना दिसतेय. काही दिवसांपूर्वीच पूजाने काळ्या टॉपमधील आपला एक फोटो शेअर करत हा डीनर लूक असल्याचं म्हटलं होतं. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार हुवाफीन फुशी मालदीव्ज या हॉटेलमधील एका रात्रीचं भाडं आहे ९४ हजार रुपये. एका नाईटच्या भाड्यामध्ये रुमचं भाडं ७६ हजार १६७ रुपये आणि कर म्हणून १७ हजार ६७१ रुपये आकारले जातात. तसेच चार्ड ड्यू प्रॉपर्टीच्या नावाखाली ८९४ रुपये घेतले जातात. म्हणजेच या हॉटेलमध्ये एक रात्र थांबण्याचं भाडं हे ९४ हजार ७३१ रुपये इतकं आहे. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

‘ठरलं तर मग’मध्ये एन्ट्री घेणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता! यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो