-
काही दिवसांपूर्वी हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
-
या धमाकेदार ट्रेलरने चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवून ठेवली आहे.
-
या चित्रपटात मुख्य भूमिकेत सात बायका आणि एक पुरुष आहे.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय चेहरे एकाच वेळी या चित्रपटातून झळकणार आहेत.
-
‘झिम्मा’ या चित्रपटात ७ वेगवेगळ्या वयोगटातील महिला आहेत.
-
या चित्रपटात वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत मनमुराद जगण्यासाठी इंग्लंडला जातात आणि मग काय धम्माल होते, हे लवकरच प्रेक्षकांना ‘झिम्मा’मधून पाहायला मिळणार आहे.
-
सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
-
चित्रपटसृष्टीतील सात वेगळ्या धाटणीच्या अभिनेत्री एकाच चित्रपटात पाहायला मिळणे, ही प्रेक्षकांसाठी खरंच पर्वणी ठरणार आहे.
-
या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे.
-
क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
-
‘झिम्मा’ चित्रपट १९ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन