-
अभिनेत्री करीना कपूर -खान आणि सैफ अली खान यांचा लाडका लेक कायमच प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतो.
-
बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड म्हणून तैमूर ओळखला जातो.
-
त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
-
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.
-
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
सैफ अली खानने यापूर्वी अनेक दमदार चित्रपटात काम केले आहे.
-
सैफ अली खान, अजय देवगण आणि काजोल यांचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
-
या चित्रपटात सैफ अली खानने उदयभान सिंह राठौडची भूमिका साकारली होती.
-
दरम्यान सैफचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट पाहिल्यानंतर धाकटा लेक तैमूर याने फारच वेगळी प्रतिक्रिया दिली होती. त्याची प्रतिक्रिया पाहून घरातील सर्वचजण थक्क झाले होते.
-
सैफने नुकंतच राणी मुखर्जीसोबत बोलताना याबाबतचा खुलासा केला आहे.
-
यावेळी राणीने सैफला ‘तान्हाजी’ चित्रपट, त्यातील भूमिकेबद्दल काही प्रश्न विचारले होते. यात राणीने सैफला या चित्रपटानंतर तैमूरची प्रतिक्रिया कशी होती? असा प्रश्न विचारला.
-
यावर सैफ म्हणाला, तान्हाजी चित्रपट पाहिल्यानंतर तैमूर आम्हाला मला वाईट माणूस बनायचं आहे,” असे सांगितले.”मला वाईट माणूस बनून बँक लुटायची आहे,” असेही तो म्हणाला.
-
तसेच एक बनावट तलवार हातात घेऊन हिंसकपणे तो दिवसभर घरात वावरायचा. तो सतत काही गोष्टींचा पाठलाग करत असायचा, असेही सैफने सांगितले.
-
तैमूर असे का का करतो याची आम्हाला कल्पना नव्हती. पण यानंतर मी त्याला समजावून सांगितले की “तू एक चांगला मुलगा आहे. तुझ्या वडिलांनी या चित्रपटात फक्त एक भूमिका साकारली आहे.”
-
पण त्यावर तैमूर म्हणाला की, “मला वाईट माणूस व्हायचे आहे आणि बँक लुटायची आहे. सर्वांचे पैसे चोरायचे आहेत.”
-
यानंतर करिनाने मात्र तैमूरला काहीही सांगितले नाही. त्याउलट ती सैफकडे आली आणि “कृपया यातून मला सोडव”, असे ती म्हणाली.
-
दरम्यान सैफ अली खान राणी मुखर्जीसोबत बंटी और बबली २ मध्ये झळकणार आहे. बंटी और बबली २ हा चित्रपट १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन