-
बॉलिवूडमधील सध्याच्या काळामधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असणारा अभिनेता म्हणजे, कार्तिक आर्यन.
-
तसा कायमच या ना त्या कारणाने चर्चेत असणारं कार्तिक आर्यन हे नाव सध्या चर्चेत आहे प्रमोश्नसमुळे. याच प्रमोशनसाठी कार्तिक सध्या मुंबई- दिल्ली, दिल्ली-मुंबई अशी धावपळ करताना दिसतोय.
-
आता कार्तिक कसलं प्रमोशन करतोय असा प्रश्न पडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की नेटफ्लिक्सवर लवकरच त्याचा धमाका हा चित्रपट प्रदर्शित होतोय. त्याच्याच प्रमोशनसाठी तो भटकतोय.
-
नुकताच तो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येही जाऊन आला.
-
सलमान खानसोबत गळाभेट घेताना हा फोटो कार्तिकने पोस्ट केलाय.
-
मात्र बिग बॉसमधील या प्रमोशननंतर कार्तिक थेट एका चायनीजच्या गाडीवर.
-
बोनेटवरच चायनीज खाद्य पदार्थाची प्लेट ठेऊन एखाद्या सर्वसामान्यप्रमाणे पदार्थांचा आनंद घेतानाचे त्याचे फोटो सध्या व्हायरल झालेत.
-
आपल्या आवडत्या पदार्थांची ऑर्डर कार्तिकने दिली.
-
त्यानंतर अगदी मनसोक्तपणे कार्तिकने या स्ट्रीट फूडचा आनंद घेतला. जुहूमधील सागर स्नॅक्स कॉर्नरमध्ये कार्तिक चायनीज स्ट्रीट फूड खाण्यासाठी गेलेला.
-
हातात प्लेट पकडून खाण्याचा कंटाळा आला म्हणून आपल्या लॅम्बॉर्गिनी गाडीच्या बोनेटचा कार्तिकने टेबलसारखा वापर केला. या ठिकाणी कार्तिक आपल्या मित्रासोबत स्वत:च्या आलिशान गाडीने आला होता.
-
कार्तिकच्या या खादाडी दौऱ्याचे फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत.
-
कार्तिकनेच यातील एक फोटो शेअर करत फारच धमाकेदार चायनीज होतं, असं म्हटलंय.
-
कार्तिकने याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये साडेचार कोटींची ही लॅम्बॉर्गिनी गाडी विकत घेतलीय. त्यामुळे साडेचार कोटींच्या या गाडीच्या बोनेटवर कार्तिकला चायनीज खाताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं असेल तर त्यात काहीच गैर नसल्याचं चाहते म्हणत आहेत. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

‘ठरलं तर मग’मध्ये एन्ट्री घेणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता! यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो