-
हिंदी चित्रपटसृष्टीत आई-वडिलांच्या अभिनयाचा वारसा पुढे नेणाऱ्या कलाकारांची अनेक उदाहरणे आहेत.
-
आजवर अनेक सेलिब्रिटी मुलांनी आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
-
श्रिया पिळगावकर, सखी गोखले, अभिनय बेर्डे, स्वानंदी टिकेकर या मराठी कलाकारांच्या मुलांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केले.
-
या यादीत स्वामिनी वाडकर हिचे नाव समाविष्ट झाले.
-
मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयवंत वाडकर यांची स्वामिनी ही कन्या आहे.
-
आकाश ठोसरच्या ‘एफयू’ चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
-
स्वामिनीने सचिन पिळगावकर यांच्या ‘ये है आशिकी’ या चित्रपटात काम केले.
-
वडिलांप्रमाणेच स्वामिनीसुद्धा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
-
इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती शेअर करत असते.
-
या फोटोंमध्ये स्वामिनीचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतो.
-
स्वामिनीला अभिनयासोबतच नृत्याचीसुद्धा आवड आहे.
-
स्वामिनी आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी यांच्यात खूप चांगली मैत्री आहे.
-
जयवंत आणि लक्ष्मीकांत यांची जेवढी घट्ट मैत्री होती तेवढीच घट्ट मैत्री स्वामिनी आणि स्वानंदीमध्येही आहे.
-
आजही अनेक कार्यक्रमांमध्ये या दोघी एकत्रच जातात.
-
जयवंत आणि लक्ष्मीकांत यांच्या मैत्रीचा वारसा ही पिढीही आता पुढे नेतेय असं म्हणायला हरकत नाही.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वामिनी वाडकर / इन्स्टाग्राम)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य