-
अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी समजली जाते.
-
सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर सोहाने अनेक चित्रपटात काम केले.
-
मात्र मुलीच्या जन्मानंतर सोहाने सिनेसृष्टीतून काही काळ ब्रेक घेतला.
-
सोहा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
अनेकदा सोहा तिचे काही फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
अलिकडेच सोहाने तिच्या एका छोटेखानी ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये सहकुटुंब एन्जॉय करताना दिसत आहे.
-
सोहा सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यात भटकंती करत असून येथील फोटो तिने शेअर केले आहेत.
-
ताडोबा-अंधारी प्रकल्प म्हणजे ‘जंगलच्या राजा’चे साम्राज्य.
-
या ताडोबा सफारीदरम्यान सोहाला वाघांचे दर्शन झाले.
-
वन्य प्राण्यांच्या सहज दर्शनासाठी ताडोबा विशेष उल्लेखनीय आहे. म्हणूनच जंगल सफारीसाठी या प्रकल्पाला विशेष पसंती असते, दरवर्षी हजारो पर्यटक वाघ पाहण्यासाठी खास ताडोबात येतात.
-
सोहाने ताडोबा अभयारण्यातल्या काही प्राण्यांचे फोटोही शेअर केले आहेत.
-
कुणाल आणि सोहाच्या लग्नाला सहा वर्ष उलटली आहेत.
-
या दोघांना इनाया ही मुलगी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोहा अली खान / इन्स्टाग्राम)

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन