-
बॉलीवूडची प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लेकीचा म्हणजेच आराध्या बच्चन दहा वर्षांची झाली आहे.
-
आराध्याचा काल वाढदिवस होता. यावेळी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
-
यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेकने तिच्या वाढदिवसानिमित्ताने खास मालदिवची ट्रीप प्लॅन केली होती.
-
मालदिवमधील एका रिसॉर्टमध्ये आराध्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
-
“माझी परी आराध्या १० वर्षांची झाली. आराध्या तू माझ्या श्वास घेण्याचे कारण आहेस. तू माझे जीवन आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते,” अशी कॅप्शन देत ऐश्वर्या दिली आहे. या वाढदिवसाच्या पार्टीचे काही निवडक फोटो ऐश्वर्या-अभिषेकने शेअर केले आहेत.
-
ऐश्वर्या आणि अभिषेकने आराध्यासोबत परफेक्ट फॅमिली फोटो शेअर केला आहे.
-
यावेळी आराध्याने छान गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यात ती सुंदर बाहुलीप्रमाणे दिसत आहे.
-
यातील एका फोटोत तिच्यासमोर मोठा केक ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.
-
तर एका फोटोत ती फार सुंदर हसताना दिसत आहे.
-
आराध्याच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश