-
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह सासू, सासरे यांच्यावर पत्नी स्नेहाने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार केल्यानंतर या प्रकरणी पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
पती अनिकेत विश्वासराव,सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघां विरोधात स्नेहा विश्वासराव यांनी तक्रार दिली आहे.
-
स्नेहाने वयाच्या १९व्या वर्षी अविष्कार दार्वेकरशी लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. एका मुलाखतीतमध्ये स्नेहा वाघने तिला घरगुती हिंसाचाराचा समाना करावा लागला असून तो काळ तिच्यासाठी खूपच कठीण असल्याचा खुलासा केला होता. अविष्कार आणि स्नेहाने घटस्फोट घेतला.
-
२०१५मध्ये स्नेहाने अनुराग सोलंकीशी दुसऱ्यांदा लग्न केले. लग्नाच्या आठ महिन्यांनंतर अनुराग आणि स्नेहानाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०१८मध्ये स्नेहाने एका मुलाखतीमध्ये बोलत असताना तिच्या दोन्ही अपयशी ठरलेल्या लग्नांचा खुलासा करत त्यामागचे कारणदेखील सांगितले होते.
-
मुंबईपासून जवळचं असलेल्या इगतपुरीमध्ये नाशिक पोलिसांनी एका बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी या कारवाईत १० पुरुष आणि १२ महिलांसह एकूण २२ जणांना अटक केली होती.
-
रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्यांची नावं समोर आली असून, यात ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हिना पांचाळ हिच्यासह मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्रींना अटक करण्यात आली होती.
-
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री क्रांती रेडकर पती समीर वानखेडे यांच्यामुळे चर्चेत आहे.
-
मुंबईत क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात अभिनेता शहारुख खान यांचा मुलगा आर्यन याला अटक करणारे अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबईचे (एनसीबी) विभागीय अधिकारी समीर वानखेडेंच्या धर्मापर्यंत अनेक बाबींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत.
-
पॉर्न फिल्मस प्रकरणात राज कुंद्राचा सहकारी म्हणून उमेश कामतला अटकही झाली होती. आता या उमेश कामतचा नी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा कलाकार उमेश कामत याचा नामसाधर्म्याखेरीज काहीही संबंध नाही.
-
परंतु काही माध्यमांनी याची शहानिशा न करता आरोपी उमेश कामतचा म्हणून कलाकार उमेश कामतचा फोटो वापरला नी उमेशला विनाकारण प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावं लागलं.
-
एका नवोदित अभिनेत्याला धमकी देऊन खंडणी उकल्याप्रकरणी ‘पिंजरा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये झळकलेली अभिनेत्री सारा श्रवणला पुणे पोलिसांनी अटक केली होती.
-
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह सुजाता फार्म लिया कंपनीचे संचालक जयंत म्हाळगी व सुजाता म्हाळगी या तिघांवर मुळशी तालुक्यातील डोंगरगाव व होतले येथील विविध जमीन गटांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल