-
अभिनेता अंकित मोहन आणि त्याची पत्नी अभिनेत्री रुची सवर्ण यांनी आजवर अनेक हिंदी आणि मराठी मालिकांसोबतच सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.
-
रुची आणि अंकितने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
-
रुची-अंकित लवकरच आई बाबा होणार आहेत.
-
खास फोटो शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
-
रुचीने ‘मॅटर्निटी फोटोशूट’मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसतेय.
-
फोटोत रुची तिचं बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय.
-
अंकित आणि रुचिच्या या खास फोटोंवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सख्या रे’ या मालिकेतून रुचीला विशेष पसंती मिळाली.
-
अंकित आणि रुचिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलंय.
-
‘फत्तेशिकस्त’ या सिनेमातही दोघं महत्वाच्या भूमिकेत झळकले होते. या सिनेमात अंकितने यसाजीची भूमिका साकारली होती. तर रुचि सोयराबाईंच्या भूमिकेत झळकली होती.
-
अंकित ‘मन फकिरा’ या सिनेमातही झळकला होता.
-
लवकरच अंकित ‘पावनखिंड’ सिनेमात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुची सवर्ण / इन्स्टाग्राम)

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन