-
अजय-अतुल या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला आपल्या संगीतानी वेड लावलं.
-
अजय-अतुल यांना भुरळ घातली ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमानी.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घराघरांत अगदी आवडीनी पहिली जाते त्याचप्रमाणे अजय-अतुल हेसुद्धा हा कार्यक्रम न चुकता पाहतात.
-
‘इंडियन आयडल मराठी’ या सोनी मराठी वाहिनीवर २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमात अजय-अतुल ही जोडी परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
त्यानिमित्ताने अजय-अतुल यांनी हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावली.
-
‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमामध्ये परीक्षक होण्याचं आम्ही यासाठी ठरवलं की, त्यानिमित्ताने आम्हाला हास्यजत्रेच्या मंचावर जाता येईल, असंही ते या वेळी गमतीने म्हणाले.
-
अजय-अतुल ही जोडी हास्यजत्रेत आली असताना एक दुग्धशर्करा योग जुळून आला आणि तो म्हणजे अतुल गोगावले यांनी हास्यजत्रेच्या मंचावर एका स्कीटचं सादरीकरण केलं.
-
अजयसाठी हे सरप्राईज होतं.
-
त्याला यातलं काहीच माहीत नव्हतं.
-
आपल्या भावाला मंचावर पाहून अजयला आश्चर्यमिश्रित आनंद झाला.
-
आम्हाला हसवणाऱ्या आणि आमचं लॉकडाऊन सुसह्य करणाऱ्या हास्यजत्रेला आपल्या परीने काहीतरी द्यावं म्हणून एखाद्या स्कीटमध्ये सहभागी व्हावं, असं वाटल्याचं अतुल म्हणाला.
-
संगीतकार जेव्हा विनोदी भूमिका करतो, तेव्हा नक्की काय होतं, हे जाणून घेण्यासाठी या आठवड्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नक्की पाहा.
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश