-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे.
-
या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
गेल्या अनेक दिवसांपासून साजिरी आणि शौनकच्या लग्नाची उत्सुकता होती.
-
अनेक संकटांचा सामना केल्यानंतर अखेर साजिरी आणि शौनक विवाहबंधनात अडकणार आहे.
-
साजिरी आणि शौनकला आशीर्वाद देण्यासाठी ‘स्वाभिमान’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘आई कुठे काय करते’, ‘फुलाला सुगंध मातीचा’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतले कलाकार खास हजेरी लावणार आहे.
-
यासोबतच ‘मी होणार सुपरस्टार’ छोटे उस्तादचे जज सचिन पिळगांवकर आणि सूत्रसंचालक सिद्धार्थ चांदेकर आणि अवनी जोशी यांची देखिल या लग्नसोहळ्याला खास उपस्थिती असणार आहे.
-
स्टार प्रवाहच्या परिवारासोबतच लवकरच भेटीला येणाऱ्या ‘झिम्मा’ सिनेमाच्या टीमनेही खास हजेरी लावत साजिरी आणि शौनकला त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
-
२१ नोव्हेंबरला २ तासाच्या विशेष भागामध्ये ‘मुलगी झाली हो’ मालिकेतला हा शाही विवाहसोहळा प्रेक्षकांना पहाता येईल.
-
मालिकेतल्या या लग्नसोहळ्यासाठी साजिरी म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर खूपच उत्सुक आहे.
-
लहानपणापासून ज्याचं स्वप्न पाहिलं त्या शौनकशी विवाह होत असल्यामुळे तिचं स्वप्न पूर्ण होत आहे.
-
या विवाहसोहळ्यासाठी साजिरीचा खास लूक डिझाईन करण्यात आला आहे.
-
मेहंदी, संगीत, हळद आणि लग्नातला लूक बऱ्याच लूक टेस्ट घेतल्यानंतर फायनल करण्यात आला आहे.
-
नववधूच्या रुपात स्वत:ला पाहिल्यानंतर माझं खरंच लग्न होतंय असं वाटत होतं.
-
त्यामुळे मी आणि ‘मुलगी झाली हो’ मालिकेची संपूर्ण टीम या खास विवाहसोहळ्यासाठी उत्सुक आहोत.
-
‘मुलगी झाली हो’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे.
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश