-
करोना काळात अभिनेता सोनू सूद सध्या गरिबांसाठी ‘मसिहॉं’ बनला आहे.
-
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक मदतीसाठी सैरावैरा भटकत होते, तर दुसरीकडे अशा लोकांसाठी अभिनेता सोनू सूद अगदी देवदूतासारखा मदतीसाठी धावून येत होता.
गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये त्याने मजूरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत केली होती. विशेष म्हणजे लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आल्यानंतर अद्यापही तो अनेकांच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहे. -
पण तुम्हाला माहितीये का? ऐश्वर्या राय ही सोनू सूदला भाऊ मानते. त्या दोघांचे संबंध फार जुने आहेत.
सोनू सूदने स्वत: एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता. -
सोनू सूदने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याला बच्चन कुटुंबियांबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते.
यावर तो म्हणाला, “बच्चन कुटुंबाशी माझे फार घट्ट नाते आहे. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे माझे आवडते अभिनेते आहेत.” “बच्चन कुटुंबातील सर्व लोक खूप छान आहेत. ते जेव्हा चित्रिकरणाच्या सेटवर भेटतात तेव्हा त्यांना भेटून फार छान वाटते.” असेही सोनूने सांगितले. -
“सेटवर काम करताना अमिताभ सर अनेकदा त्यांच्या ओळी पुन्हा पुन्हा बोलत असतात.” असाही किस्सा सोनू सूदने यावेळी सांगितला.
“तर अभिषेक हा चित्रपटात जसा दिसतो, तसाच तो खऱ्या आयुष्यातही आहे,” असेही सोनू म्हणाला. “बच्चन कुटुंबातील सर्वांसोबतच मी काम केले आहे. ‘बुड्ढा होगा तेरा बाप’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी माझ्या वडिलांची भूमिका साकारली होती.” असे सोनूने सांगितले. तर ‘युवा’ या चित्रपटाच्या निमित्ताने मला अभिषेकसोबत काम करता आले. त्यावेळी मी त्याच्या भावाची भूमिका साकारली होती. -
त्यानंतर ‘जोधा अकबर’ या चित्रपटात ऐश्वर्या रायने जोधाची भूमिका साकारली होती. तर मी जोधाचा चुलत भाऊ म्हणून यात झळकलो होतो.
-
‘जोधा अकबर’ या चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या कामाबद्दल फार सक्रीय असायची. एखादा सीन चित्रित झाल्यानंतर ती त्याबद्दल मोकळेपणाने बोलायची.
-
यावेळी तिने एकदा बोलताना म्हटले होते की, “जेव्हा जेव्हा मी तुला पाहते, तेव्हा मला माझ्या वडिलांची आठवण येते.”
-
या चित्रपटानंतर ऐश्वर्या अजूनही सोनू सूदला ‘भाई साहेब’ म्हणूनच आवाज देते.
तर सोनू सूदही तिला बहिणीप्रमाणे मान देतो.

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण