-
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सैफचा ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटात सैफ राणी मुखर्जीसोबत लोकांची फसवणूक करताना दिसत आहे. दरम्यान, तैमूरने हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय होती हे सैफने सांगितलं आहे.
-
‘बंटी और बबली २’ या चित्रपटात सैफ अली खानने एका मध्यमवर्गीय व्यक्तीची भूमिका साकारली आहे. जो लोकांची फसवणूक करतो.
-
तर चित्रपट पाहिल्यानंतर मुलगा तैमूरची प्रतिक्रिया कशी होती हे सैफने ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
-
तैमूरला नायक आणि खलनायकातील फरक चांगलाच ठाऊक आहे. मी नायक किंवा खलनायकाची भूमिका साकारली नाही, त्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर तैमूरने मला एक प्रश्न विचारला, असं सैफ म्हणाला.
-
“तू या चित्रपटात चांगला का आहेस, तू या चित्रपटात लोकांना मारतोस? तुम्ही मिळून लोकांची फसवणूक का करता? तू या चित्रपटात काय करतोस?,” असे प्रश्न तैमूरने सैफला विचारले.
-
यावर उत्तर देत सैफ म्हणाला, “ठीक आहे, ही एक सुंदर भूमिका आहे, तो एक चांगला माणूस आहे आणि कोणालाही मारत नाही. तो चोर आहे.”
-
“त्यानंतर लोकांचं बोलणं ऐकल्यानंतर त्याला कळलं की मी चित्रपटात जे काही करत आहे ते एक नाटक आहे”, असे सैफने सांगितले.
-
याआधी सैफने ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटावर तैमूरची प्रतिक्रिया कशी होती ते सांगितलं. ‘तानाजी’ पाहिल्यानंतर तैमूर खोटी तलवार घेऊन लोकांचा पाठलाग करु लागला होता.
-
दरम्यान, ‘बंटी और बबली’ हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. तर ‘बंटी और बबली २’ या चित्रपटात सैफसोबत राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि शरवरी वाघ मुख्य भूमिकेत आहे. (Photo Credit : File Photo)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण