-
‘बिग बॉस’ मराठीचा हा आठवडा विशेष ठरला कारण घराला मिळाले होते टॉप १० सदस्य.
-
आठवड्याच्या सुरूवातीपासूनच घरामध्ये राडे बघायला मिळाले.
-
घरातील समीकरण बदलताना दिसली.
-
मीनल आणि गायत्री, तर जय आणि विकास मध्ये राडा झाला.
-
मीरा आणि उत्कर्ष होते गायत्रीवर नाराज तर, विकास आणि सोनालीमध्ये दखील झाले भांडण.
-
दुसरीकडे कार्यामध्ये विघ्न आणाल्या कारणाने मीरा आणि विशालला भोगावी लागली कारागृहाची शिक्षा.
-
गायत्री दातार बनली घराची कॅप्टन.
-
घरामध्ये झालेल्या राड्यांवर महेश मांजरेकर यांनी सदस्यांची शाळा घेतली, कोण कुठे चुकते आहे हे सांगितले आणि सदस्यांची कानघडणी केली.
-
याचसोबत ‘बिग बॉस’च्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे स्नेहा, सोनालीला, सांगितली.
-
दादूस, विकास आणि विशाल यांनी ‘बिग बॉस’च्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली.
-
नॉमिनेशन कार्यात या आठवड्यात घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये उत्कर्ष, दादूस, मीरा, स्नेहा, गायत्री आणि सोनाली नॉमिनेट झाले.
-
कालच्या भागामध्ये या सदस्यांमध्ये गायत्री, सोनाली सेफ झाली आणि उत्कर्ष, मीरा, स्नेहा आणि दादूस डेंजरमध्ये गेले.
-
मीरा आणि स्नेहा डेंजर झोनमध्ये होते ज्यामध्ये स्नेहा वाघला ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.
-
कसा असणार नवा आठवडा? कोणते सदस्य होणार नॉमिनेट? कोणकोणते नवे टास्क घरामध्ये रंगणार?
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश