-
छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे.
-
‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
-
नुकतंच ‘बिग बॉस’च्या घरात ३ वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एण्ट्री झाली आहे.
-
अभिनेत्री रश्मी देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि अभिजीत बिचुकले या तीन स्पर्धकांनी ‘बिग बॉस’ हिंदीमध्ये सहभागी झाले.
-
मात्र अभिजीत बिचुकले नेमके कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
-
अभिजीत बिचुकले हे साताऱ्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले.
-
अभिजीत बिचुकले हे ‘बिग बॉस’ मराठी सिझन 2 मधील स्पर्धक म्हणून ओळखले जातात
-
अभिजीत बिचुकले स्वत:ला कलाकार, लेखक, कवी, गायक आणि कंपोजिशन मेकर असे समजतात.
-
त्यांनी आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत.
-
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलं आव्हान दिलं आहे.
-
‘बिग बॉस’च्या घरात वादग्रस्त वक्तव्य करणे, टास्क खेळताना नियमांच्या विरुद्ध वागणे, घरातील महिला सदस्यांसोबत फर्ल्ट करणे यासाठी प्रसिद्ध आहे.
-
‘बिग बॉस’च्या घरात वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अल्पावधीतच प्रसिद्ध मिळाली आहे.
-
गेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा आणि सांगलीतून उमेदवारी अर्जही भरला होता.
-
त्याशिवाय विधानसभा निवडणुकीत त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढली होती.
-
‘बिग बॉस मराठी’च्या सेटवरून त्यांना चेक बाऊन्सच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
-
२०१९ मध्ये निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात बिचुकले यांनी आपली एकूण संपत्ती केवळ ७८ हजार ५०३ रुपये इतकी असल्याचे नमूद केले होते.
-
विशेष म्हणजे त्यांची पत्नी अलंकृता यांच्या नावावर बिचुकलेंपेक्षा चौपटीहून अधिक असल्याचे दिसत आहे.
अलंकृता यांच्या नावावर ३ लाख ६६ हजार ८१८ रुपये आहेत असं बिचुकलेंनी स्पष्ट केलं आहे. -
त्यासोबतच बिचुकले यांनी स्वत:कडे दागिने, गाडी, पॉलिसी असं काहीही नसल्याचं म्हटलं होते.
-
तसेच त्यांच्याकडे ७५ हजारांची रोख रक्कम असून तीन बँकांमध्ये ३ हजार ५०३ रुपये आहेत, असे त्यांनी सांगितले होते.
-
तर दुसरीकडे पत्नी अलंकृता यांच्याकडे ४० हजार रुपये रोख रक्कम आहे. तर बँक खात्यांमधील रक्कम, पॉलिसी, दुचाकी, सोन्या चांदीचे दागिने अशी एकूण ३ लाख २६ हजार ८१८ रुपयांची मालमत्ता आहे असं या प्रतिज्ञापत्रात बिचुकलेंनी स्पष्ट केलं होतं.
-
अलंकृता यांच्या नावावर ८० हजारांची दुचाकी आणि ९० हजार किंमतीचे तीन तोळे सोने आहे.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…