-
आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या श्रेया घोषालने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
-
श्रेयाच्या घरी २२ मे रोजी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं.
-
“आज दुपारी देवाने आशिर्वादाच्या रुपात आम्हाला मौल्यवान मुलगा दिला आहे. अशा प्रकारची भावना या आधी कधीच अनुभवली नव्हती. तुम्हा सर्वांच्या आशिर्वादासाठी धन्यवाद” अशा आशयाची पोस्ट शेअर करत श्रेयाने आई झाल्याचा आनंद व्यक्त केला होता.
-
मुलाच्या जन्मानंतर श्रेयाने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
पण त्यात बाळाचा चेहरा मात्र दिसत नव्हता.
-
आता पहिल्यांदा आपल्या बाळासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
-
बाळाचं नाव देवयान मुखोपाध्याय असं ठेवलं आहे.
-
हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
या पोस्टवर तिला अनेक सेलिब्रिटींनी तसचं चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
-
श्रेयाने तिच्या हटके व्हर्च्युअल डोहाळे जेवणाचे फोटो देखील शेअर केले होते.
-
श्रेयाने २०१५ मध्ये प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्नगाठ बांधली.
-
बंगाली रितीरिवाजानुसार श्रेया-शिलादित्यचं लग्न झालं.
-
श्रेयाचा पती मुंबईतील एका टेक्नॉलोजी कंपनीचा मालक आहे.
-
अनेकदा तिच्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया घोषाल / इन्स्टाग्राम)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश