-
मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा म्हणजे अभिनेत्री हृता दुर्गुळे.
-
आजपर्यंत हृताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
हृताच्या दुर्वा आणि वैदेही या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
तिच्याविषयी प्रत्येक माहिती जाणून घेण्यासाठी चाहते आतूर असतात.
-
हृताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबूली दिली.
-
हृता टीव्ही दिग्दर्शक प्रतीक शाहला डेट करत आहे.
-
प्रतीकने काही मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
-
त्याने ‘बेहद २’, ‘बहू बेगम’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘तेरी मेरी एक जिंदड़ी’ मालिकांसाठी काम केले आहे.
-
हृताच्या या पोस्टवर कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनीच शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
हृताने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
-
हृता सध्या ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत दिपूची भूमिका साकारताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : हृता दुर्गुळे / इन्स्टाग्राम)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश