-
बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय लेखक म्हणून सलीम खान ओळखले जातात.
-
त्यांनी अनेक हिट चित्रपटांची कथा लिहिली आहे.
-
पण सलीम खान यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफ देखील चर्चेत होती.
-
जेव्हा सलीम खान यांनी हेलन यांच्याशी लग्न केले तेव्हा ते विवाहित होते आणि त्यांना ४ मुले होती.
-
कुटुंबीयांना न सांगता सलीम खान यांनी हेलन यांच्याशी लग्न केले होते.
-
जेव्हा पहिल्यांदा सलीम खान लग्नानंतर हेलन यांना घरी घेऊन गेले तेव्हा त्यांची पहिली पत्नी सलमा यांनी दरवाजा उघडला होता.
-
सलीम खान आणि हेलन यांनी लग्न केलेले पाहून त्यांना धक्काच बसला होता.
-
सलीम खान यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता.
-
जेव्हा पहिल्यांदा लग्नानंतर हेलन यांना घरी घेऊन गेले तेव्हा कुटुंबीयांनी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला होता. तसेच सलमान खानला देखील सलीम यांचा निर्णय आवडला नव्हता.
-
‘सलमान त्यावेळी लहान होता. हेलन यांच्याशी बोलणे वैगरे सलमानला फार आवडत नव्हते. मुलं त्यांची आई कसं वागते हे पाहून वागत होते’ असे सलीम म्हणाले होते.
-
पुढे ते म्हणाले, ‘सुरुवातीला सलमाला माझे आणि हेलनचे नाते मान्य नव्हते. सलमाचे वागणे पाहून मुलं पण तशीच वागत होती. तेव्हा घरात कुणीही हेलनशी बोलत नव्हते.’
-
सलीम आणि हेलन यांच्या लग्नामुळे सलमा यांना मोठा धक्का बसला होता. त्या नैराश्यामध्ये गेल्याचे म्हटले जाते. पण थोड्या दिवसांनंतर सर्व काही बदलले.
-
आता सलमा, हेलन आणि सलीम खान मुलांसोबत एकत्र आनंदाने राहतात.

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा