-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे देवोलीना भट्टाचार्जी.
-
‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील तिचे गोपी बहू हे पात्र विशेष गाजले.
-
या मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली.
-
त्यानंतर ती बिग बॉसच्या घरात दिसली होती.
-
आता देवोलीनाने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.
-
दरम्यान, तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
-
‘लेडीज वर्सेस जेंटलमॅन’ या शोमध्ये देवोलीनाने हजेरी लावली होती.
-
त्यावेळी तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
-
या शोचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.
-
या व्हिडीओमध्ये देवोलीनाने ट्यूशन घेणाऱ्या शिक्षकांनी चुकीची वागणूक दिल्याचे सांगितले आहे.
-
‘त्यावेळी आमच्या इथे खूप चांगले गणिताचे शिक्षक होते. सर्वजण त्यांच्याकडे ट्यूशनसाठी जात असत. सर्व हुशार मुले आणि माझी मैत्रीण देखील त्या शिक्षकाकडे ट्यूशनसाठी जात होती. अचानक एक आठवड्यानंतर माझ्या मैत्रीणीने जाणे बंद केले. आठवड्यानंतर मी ट्यूशनला जाणे सुरु केले. ट्यूशन घेणाऱ्या शिक्षकांनी माझ्यासोबत गैरवर्तवणूक केली. मी घरी परत आले आणि जे काही घडलं ते आईला सांगितले’ असे देवोलीना म्हणाली.
-
पुढे देवोलीना म्हणाली, ‘आम्ही त्या शिक्षकाच्या घरी गेलो आणि त्यांच्या पत्नीकडे याबाबत तक्रार केली. पण मला त्यांच्या विरोधात कडक कारवाई करायची होती. माझ्या दोन्ही मैत्रीणींसोबत असच काही झाले असेल म्हणून त्यांनी ट्यूशनला येणे सोडून दिले होते. त्या शिक्षकांना वाटले असेल की कोणाला काही कळणार नाही.’
-
देवोलीनाचे बोलणे ऐकून ‘लेडीज वर्सेस जेंटलमॅन’चे परीक्षक जय भानुशाली, जिनिलिया डिसूजा, रितेश देशमुख आणि टेरेंस लुईसला धक्का बसला.
-
देवोलीना आता लवकरच ‘बिग बॉस १५’च्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री करणार आहे.
-
बिग बॉसच्या घरात पुन्हा देवोलीना दिसणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”